जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी स्वत हातात. झाडू घेऊन परिसर स्वच्छ केला तर हातात हॅन्डग्लोज घालून कचरा उचलला.
माढा तालुका / लोकवेध live न्यूज / हनुमंत मस्तुद
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेश “एक तारीख एक तास” या मोहिमे खाली स्वच्छतेसाठी लाखो हात झटले.. हजारो टन कचरा गोळा करणे बरोबर आबाल वृध्द, अपंग या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. दरम्यान आज जिल्हा परिषद आवार व मंदिर परिसरात घेणेत आलेल्या स्वच्छता मोहिमेत जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी स्वत हातात. झाडू घेऊन परिसर स्वच्छ केला तर हातात हॅन्डग्लोज घालून कचरा उचलला.
आपले घराबरोबर परिसर देखील स्वच्छ ठेवा असे आवाहन आज जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी जिल्हा वासियांना केला.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत स्वच्छता ही सेवा हा उपक्रम दिनांक 15 सप्टेंबर 2023 ते 02 ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये राबविण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार आज दिनांक 01 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10.00 ते 11.00 वा. या वेळेत जिल्हातील प्रत्येक तालुक्यामधील प्रत्येक गावात एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान मोहीम राबविणेत आली.
जिल्हा स्तरावर घेणेत आलेले मोहिमेत जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे व पाणी व स्वच्छतेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, स्वच्छ भारत मिशन चे ब्रॅन्ड अॅम्बेसिडर सचिन खरात, शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले,जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संतोष नवले, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी .कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, अधिक्षक अनिल जगताप, कक्ष अधिकारी विवेक लिंगराज, कक्ष अधिकारी अविनाश गोडसे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, जिल्हा परिषदेतील युनियनचे डॉ. एस.पी माने,जहीर शेख, सचिन घोडके, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय बहुजन कर्मचारी संघटनेचे कोषाध्यक्ष संतोष जाधव, रणजित गव्हाणे,,सादिक शेख, राज उपासे ,वसंत काळे आदी कर्मचारी उपस्थित होते.
