मोदीसाहेब पुणे नाशिक रेल्वेच्या कामाला गती देण्याचे आदेश द्या – आत्माराम देशमुख
संगमनेर / लोक वेध live न्यूज
नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे कामाला लवकरात लवकर सुरुवात करून द्यावे त्यामुळे संगमनेर सारख्या तालुक्याला त्याचा चांगला फायदा होईल या रेल्वे मार्गाच्या कामाला युद्ध पातळीवर सुरू करून द्यावे यासाठीचे निवेदन संगमनेर सामाजिक कार्यकर्ते आत्माराम देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले त्यांनी निवेदनात म्हटले की
आदरणीय महोदय साहेब, पुणे व्हाया संगमनेर नाशिक हायस्पीड रेल्वेच्या कामाला गती द्या. पुणे जिल्हा संगमनेर नाशिक जिल्हा हायस्पीड रेल्वेने एकमेकांना जोडून विकासाची गंगोत्री घराघरात पोहोचवावी असे विनम्रपणे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करत आहे. साहेब संगमनेरच्या पठारावर पिंपरी चिंचवड सारखी औद्योगिक वसाहत उभारण्यात यावी. संगमनेरच्या पठारावरील प्रमुख केंद्र हे घारगावला तालुक्याचा दर्जा द्या. साकूर फाटयावर २०० एकरावर गुलटेकडी, पुणे सारखी बाजार समिती उभारण्यात यावी. नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग जनकल्याणार्थ व्हावा. त्यामुळे शेतकरी, व्यापारी, औद्योगिकीकरणाला वरदान व कॉम्प्लेमेन्टरी उद्योगधंदे असे ५लाख लोकांना नोक-या, रोजगार व हाताला काम मिळेल तरी तिन्ही जिल्हयातील लोकप्रतिनिधींनी पुणे व्हाया संगमनेर नाशिक हायस्पीड रेल्वे होण्यासाठी आपले प्रामाणिकपणे योगदान द्यावे असे विनम्रपण आव्हान करण्यात येत आहे. मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी आमच्या जिव्हाळयाच्या प्रश्नावर त्वरीत आदेश द्यावा
