भारतीय डाक विभागाच्या खेळाडूंनी रचला इतिहास !

संगमनेर / लोकवेध live न्यूज

स्नेहालय ,अहमदनगरचे डाॕ.गिरिष कुळकर्णी यांनी आयोजित केलेली दुसरी भारत बांग्लादेश सद्भावना सायकल रैलीत “नफरत छोडो भारत जोडो ” ” जय भारत जय बांगला” हा नारा देत तब्बल ८८० km अंतर सायकल वर कापत नौखाली बांगलादेश येथे २ आॕक्टोबर रोजी गांधी जयंती दिनी महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी गेले .भारतीय डाक विभागाच्या इतिहासात सुवर्ण कामगिरी करणारे पुणे येथील पोस्टमास्टर राजू गवारी व नाशिक मधील आॕफीस सहाय्यक रत्नाकर शेजवळ यांच्या कामगिरीची सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यांनी दखल घेवून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.विशेष म्हणजे रत्नाकर शेजवळ हे श्रवण दिव्यांग खेळाडू असुन पुढील वर्षी हे दोघे खेळाडू कश्मीर ते कन्याकुमारी अंतर “डाक सेवा जन सेवा”हा नारा देत सायकल वर पुर्ण करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!