कर्तृत्वसंपन्न युवक नेतृत्व – रणजितसिंह देशमुख
अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक प्रगत मानल्या जाणाऱ्या संगमनेर तालुक्यातील आंभोरे गावच्या शेतकरी कुटुंबात जन्मलेले एक उमदे नेतृत्व म्हणजे रणजीतसिंह देशमुख.ग्रामीण युवक, दूध उत्पादक आणि शेतकर्यांकच्या विकासासाठी गेली 15 वर्ष सातत्याने सुरू असलेल्या कामामुळे रणजीतसिंह देशमुख यांची युवा नेता म्हणून तालुक्यात ओळख निर्माण झाली. ग्रामीण भागातील आपल्या दांडग्या जनसंपर्काच्या बळावर स्वतंत्र ओळख निर्माण करून केवळ तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील अन् राज्यातील हजारो तरुणांच्या हृदयांत त्यांनी आपले स्थान निर्माण केले. संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे अध्यक्ष, रणजीतसिंह देशमुख यांची नुकतीच महाराष्ट्र राय सहकारी दूध महासंघ’ म्हणजेच महानंद’च्या अध्यक्षपदी नेमणूक झाली आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या व्यक्तिमत्वाचा व कार्याचा आढावा घेणारा हा लेख…
संगमनेर तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या देशमुख कुटुंबात रणजीत देशमुख यांचा जन्म झाला. समाजकारण आणि वैचारिक अधिष्ठान या कौटुंबिक पार्श्वयभूमीने महाविद्यालयीन स्तरापासूनच रणजीतसिंह देशमुख या नावाने आपली विशिष्ट ओळख त्यांनी निर्माण केली. विश्वपसनीयता, नम्र स्वभाव, कमालीचा संयम आणि कार्यमग्नता ही त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये आहेत
दुग्ध व्यवसायाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे कार्य –
15 वर्षांपूर्वी संगमनेर तालुका सहकारी दूध संघाच्या संचालकपदी झालेल्या नेमणुकीपासून तालुक्यातील ग्रामीण बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांधकडे रणजीतसिंह यांनी लक्ष दिले. ग्रामीण तरुणांनी केवळ नोकर्यांनच्या मागे न धावता उत्तम पद्धतीने दुग्ध व्यवसायात पदार्पण केल्यास ते मोठी प्रगती करू शकतात, हे ओळखून रणजीतदादांनी दूध व्यवसायाकडे ग्रामीण व शहरी युवकांना वळविण्याचे ठरविले. मात्र तरुणांचा, विशेषत: शिक्षित तरुणांचा दुग्ध व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टीकोन तितकासा सकारात्मक नसल्याचे सुरुवातीला त्यांना जाणवले. त्याकरिता या व्यवसायात आधुनिकता आणून दुग्ध व्यवसायाला एक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी रणजीतसिंह यांनी प्रयत्न सुरु केले.
मुक्त संचार गोठा पद्धतीची सुरूवात –
दादांनी आधुनिक पद्धतीने केल्या जाणार्या् दुग्ध व्यवसायाचा बारकाईने अभ्यास केला. यासाठी ब्राझील, अमेरिका, नेदरलँण्ड, अशा अनेक देशांतील दूध धंद्याचा आढावा घेऊन आपल्याकडील वातावरणास अनुकूल ठरेल अशा पद्धतीने सर्वप्रथम मुक्तसंचार गोठा’ ही संकल्पना त्यांनी संगमनेर तालुक्यात सुरु केली. या पद्धतीत दुभती जनावरे बांधून न ठेवता विशिष्ट जागेत त्यांना मुक्तपणे संचार करू दिला जातो. त्यामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहून अशी आनंदी जनावरे अधिक उत्पादनक्षम बनतात, हे रणजीतसिंह यांनी विविध गोठ्यांत प्रायोगिक संकल्पना
राबवून गोपालकांना पटवून दिले. अल्पावधीत तालुक्यातील व्यावसायिकांचे लक्ष या नवसंकल्पनेकडे वेधले गेले आणि अनेकांनी मुक्त संचार गोठा’ पद्धतीचा अंगीकार केला. पुढे जाऊन याबाबत अधिक अभ्यास व संशोधनानंतर मुक्त संचार गोठा पद्धतीचे पुढचे पाऊल त्यांनी टाकले.
मॉर्डन डेअरी फार्म गोठा पद्धती –
दुग्धव्यवसायाच्या प्रगतीचे हे पुढचे पाऊल म्हणजेच मॉडर्न डेअरी फार्म’ होय. या एम.डी.एफ. गोठा प्रणालीमध्ये दुभती जनावरे, इतर जनावरे व कालवडी-वासरे यांची स्वतंत्र व्यवस्था असते. जनावरांना मोकळी हवा, पुरेसा सूर्यप्रकाश व हवे तेव्हा चारा-पाण्याची व्यवस्था अंतर्भूत असल्याने हा टप्पा खर्यान अर्थाने शहरी तरूणांना दूध धंद्याकडे आकर्षित करण्यासाठीचा केंद्रबिंदू ठरला. मॉडर्न डेअरी फार्मिंग’च्या यशस्वीतेमुळे संगमनेर तालुक्यातील व जिल्ह्यातील हजारो बेरोजगार तरुणांना रोजगार लाभला आहे, याचे श्रेय निश्चिातच रणजीतसिंह यांच्या समाजकल्याणकारी नेतृत्वाला जाते. आज तालुक्यासह जिल्ह्यातील शेकडो मॉडर्न डेअरी फार्म’ म्हणजे ग्रामीण युवकांना लाभलेली आर्थिक संजीवनी आहे.
राजहंस दूध आणि कृषीमैत्री कार्य-
राजहंस’च्या संचालकपदी काम करत असतांनाच अवर्षणग्रस्त संगमनेर तालुक्यातील दुग्ध व्यावसायिकांच्या अडचणी कोणत्या आहेत, हे रणजीतसिंह यांनी जाणले होते. दुष्काळाच्या काळात सगळीकडे निर्माण होणारे चार्या चे दुर्भिक्ष्य त्यांना अस्वस्थ करित होते. त्यावर विशिष्ट हंगामात येणारा चारा वर्षभर कसा पुरविला जाऊ शकतो, याचा अभ्यास करून मूरघास’ या चार्या ची त्यांनी संगमनेर तालुक्यात सुरुवात केली.
मूरघास संकल्पना आणि क्रांती दुग्धव्यवसायाची –
उत्तम दर्जाचे मका वाण शेतकर्यां्ना दूध संघाद्वारे उपलब्ध करून देऊन येणार्या पिकाचा मूरघास कसा बनवावा, याची अनेक प्रात्यक्षिके रणजीतसिंह यांनी तालुकाभर राबविली. मका पिकाची एकसारखी कापणी करण्यासाठी शेतकर्यांनना दूध संघाद्वारे अत्यल्प दरात थेट तुर्कस्थान बनावटीचे कापणी मशिन उपलब्ध करून दिले. एकदा बनविलेला मूरघास’ चारा हा वर्षभर विशिष्ट प्रक्रियेने जनावरांना देता येतो व दुष्काळ प्रसंगी चार्यारच्या अडचणींवर मात करता येते, हे लक्षात आल्यानंतर संबंध तालुक्यात अगदी गोठा तिथे मूरघास’ असे चित्र उभे राहिले आणि अधिक दूध उत्पादनाद्वारे तालुक्यात एक अभिनव दुग्धक्रांती सुरु झाली आहे.
दूध व्यावसायिकांच्या अडचणींची जाणीव असल्याने त्यांचे प्रश्नग सोडविण्यासाठी केवळ पाठपुरावा पुरेसा नाही, हे लक्षात घेऊन त्यांनी निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याचा प्रयत्न केला. त्यायोगे संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाची निवडणूक आपल्या सर्व सहकार्यां ना सोबत घेऊन लढवली. रणजीतदादांच्या अभ्यासू व दिशादर्शक व्यक्तिमत्वामुळे सन 2015 मध्ये संगमनेर तालुका दूध संघाच्या चेअरमनपदी त्यांची निवड झाली.
आज संघाच्या राजहंस’ या नामांकित बॅ्रण्डला आपल्या कर्तृत्वातून एक अनोखी प्रतिष्ठा मिळवून देण्याचे कार्य ते करीत आहेत. संघाची गुणवत्ता व प्रगतीच्या चार दशकांच्या वारशाचा संदेश त्यांनी जपला आहे. त्यासह चीज, पनीर, तूप आदि सर्व उत्पादनांच्या आधुनिक व आकर्षक पॅकेजिंगचे कामही पूर्ण झाले आहे
राजहंस’ची नवी ओळख अन् दिशा प्रगतीच्या –
अतिरिक्त दुधाच्या हाताळणीसाठी व बाजारपेठेतील सहभाग वाढविण्यासाठी भविष्यवेधी विचार ठेऊन रणजीतसिंह यांनी दूध भुकटी निर्मिती प्रकल्प’ म्हणजेच पावडर प्लॅन्ट सुरु करण्याचा निर्णय घेतला. सन 2019-20 मध्ये संगमनेर तालुका सहकारी दूध संघाचा 15 टन क्षमतेचा पावडर प्लॅन्ट प्रकल्प मोठ्या दिमाखाने कार्यन्वित झाला अन् आता दैनंदिन पूर्ण क्षमतेने या प्रकल्पातून उत्पादन कार्य सुरु आहे. तयार होणारी दूध भुकटी आंतरराष्ट्रीय बाजारपेठांपर्यंत पोहोचविली जात आहे. या सर्व कार्याचे फलित म्हणजे गाय दुधातील राजहंस’ हा रायातील क्रमांक एकचा ब्रॅण्ड ठरला आहे. सन 2019 चा सहकारनिष्ठ’ पुरस्कारही संगमनेर दूध संघाला लाभला असून प्रगतीची विक्रमी घोडदौड रणजीतसिंह यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने सुरु आहे.
देशपातळीवर दखल अन् दुग्धविकास कार्य :
रणजीतसिंह यांनी दुग्ध व्यवसायाबाबत सुरु केलेले कार्य पाहून गुजरात, पंजाब व इतर राज्यांतली या विषयात कार्यरत असणारी मंडळी त्यांच्याकडे आकृष्ट झाली. त्यायोगे प्रोगेसिव्ह डेअरी फार्मर्स असोसिएशन’ (पी.डी.एफ.ए.) या मुळातील पंजाबच्या दुग्धव्यावसायिकांच्या संघटनेने रणजीतदादांना संस्थेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी आमंत्रित केले आणि देशातील दुधाबाबतच्या समस्या केंद्र शासनाकडे मांडण्याबाबत रणजीतसिंह यांची महत्त्वाची भूमिका सुरु झाली.
सहकारी दूध संघातील चेअरमनपद अत्यंत महत्त्वपूर्ण असते. सहकारातील चेअरमन कसा असावा, त्याचे कार्य किती प्रभावी असावे, याचे ते उदाहरण ठरत आहेत.
संघातील कर्मचार्यांचचे, तालुकाभर विस्तारलेल्या गावपातळीवरील दूध डेअर्यां चे व दूध उत्पादकांचे अनेक प्रश्नच व जटील अडचणी त्यांनी वेळोवेळी सोडविल्या आहेत. संघाच्या विकासासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. सुमारे 200 दूध डेअर्यां वरती बल्क कुलर्स, जनावरांच्या नोंदणीसाठी हर्डमन सॉफ्टवेअर ते तालुक्यात सार्वत्रिकरित्या साजरे केले जाणारे जागतिक दुग्ध दिन, वसु बारस-गायपोळा उत्सव या देशमुख यांच्या कार्याच्या पोचपावत्या आहेत.
शासनाच्या दुग्ध व कृषिविकास योजना शेतकर्यांपच्या दारापर्यंत पोहचविण्यासाठी रणजीतसिंह नेहमी प्रयत्नशील असतात.
सहकार क्षेत्र आणि सामाजिक उन्नतीच्या कार्यात रणजीतसिंह देशमुख गेल्या दीड दशकापासून कार्यरत आहेत. सामाजिक जागृती, पर्यावरण संवर्धन, दुग्धविकास, राष्ट्रीय एकात्मता, आरोग्य, पशुसंवर्धन अशा अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करताना अनुकरणीय उपक्रमांची यशस्वीता हे त्यांच्या कार्याचे द्योतक आहे.
संगमनेर अश्वोप्रेमी असोसिएशन :
गोमातेसह अश्वां वरही रणजीतदादांचे विशेष प्रेम आहे. त्यांचेकडील तबेल्यात 5-6 उमदे अश्वअ आहेत. आरोग्यासाठी व शरीर स्वास्थ्यासाठी अश्वाकरोहणाकडे एक खेळप्रकार म्हणून तरूणांनी बघावे, यासाठी संगमनेरच्या देवगड यात्रेच्या माध्यमातून दरवर्षी अश्वनस्पर्धा व अश्व बाजारा’चे आयोजन केले जाते. संगमनेरच्या अश्वषस्पर्धांनी राज्यात तसेच राज्याबाहेरही नावलौकीक मिळविला आहे.
नवी वाटचाल,महानंद’चे अध्यक्षपद :
दुग्ध व्यवसायात महानंद डेअरी ही राज्याच्या सर्व दूध संघांचे नेतृत्व करते. महानंद’चे अध्यक्षपद हे अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते. या पदावर अनेक दिग्गजांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. आता या संस्थेचे अध्यक्षपद तरूण युवा नेते रणजीतसिंह देशमुख यांच्याकडे आले आहे. सध्या अडचणीत असलेल्या या संस्थेला उर्जितावस्थेत आणण्यासाठी रणजीतसिंह देशमुख यांच्यावर राज्याच्या नेत्यांनी जबाबदारी टाकली आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरू नये.
9 जून, 1967 रोजी स्थापन झालेला महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ’ म्हणजेच महानंद’ ही राज्याच्या सहकारी दूध संघांची शिखर संस्था मानली जाते. सद्यस्थितीत महानंदचे 25 जिल्हा दूध संघ व 60 तालुका संघ असे एकूण 85 सभासद संघ आहेत. महानंद’ला उर्जितावस्थेत आणण्याची जबाबदारी आता युवा नेते व दुग्ध व्यवसाय संशोधक रणजीतसिंह देशमुख यांच्यावर सोपविली गेली आहे. त्यांची दुग्ध व्यवसायातील कार्यकुशलता पाहता, राज्यभरातील दुग्ध व्यावसायिकांच्या अपेक्षा आता उंचावल्या आहेत.
रणजीतसिंह देशमुख राज्यातील एक आदर्श व्यक्तिमत्व ठरत आहेत. शेतकऱ्यांना ते आपलेसे वाटतात. कार्यकर्त्यांना नेहमी हवेहवेसे वाटतात. तालुक्यातील व सर्वदूर जनताही त्यांच्यावर भरभरून प्रेम करते. तरुणांचे ते आयकॉन आहेत. निखळ मनाने समाजकारण आणि बळीराजाची सेवा करणारे रणजीतसिंह देशमुख यांचे एक एक पाऊल पुढे पडत आहे. सतत कार्यमग्न राहणार्या अशा या प्रभावी, प्रसन्न व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
