नान्नज विद्यालयाची बालेवाडी विभागीय पातळीवर निवड.
संगमनेर / लोकवेध live न्यूज
क्रीडा व युवक सेवा संचालनालय ,महाराष्ट्र राज्य, पुणे व अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत नान्नज दुमाला येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली विद्यालयाच्या मुलींनी उज्ज्वल यश संपादन केले आहे . प्राची विलास रामकर हिने लांब उडी (14 वर्षे वयोगट) क्रीडा प्रकारात अत्यंत जिद्दीने, उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन करत गौरवशाली यश संपादन करून बालेवाडी पुणे, विभागीय पातळीवर झेप घेतली आहे तसेच प्रतिभा दिलीप सानप हिने उंच उडी (14 वर्षे वयोगट) क्रीडा प्रकारात जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळवला आहे.अशी माहिती मुख्याध्यापक विलास नढे व ज्येष्ठ शिक्षक शशांक खोजे यांनी दिली आहे. प्राची रामकर ही लांब उडी क्रीडा प्रकारात अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
याप्रसंगी 14 वर्षे वयोगटातील प्राची विलास रामकर,प्रतिभा दिलीप सानप ,दिव्या सोन्याबापू कोटकर,
समिक्षा ज्ञानदेव चत्तर आणि 17 वर्षे वयोगटातील
ज्ञानेश्वरी बाळासाहेब कोटकर, कावेरी खंडू वाघ तसेच शुभम दशरथ जाधव या सर्व यशस्वी खेळाडूंचा बुके , गुलाबपुष्प व मेडल तसेच शैक्षणिक साहित्य भेट देवून विद्यालयात सत्कार करण्यात आला.
सदर खेळाडूंना पंडित काळे ,बाळासाहेब पिंगळे,मंगेश गडाख यांनी मैदानी स्पर्धेचे मौलिक मार्गदर्शन केले.
यशस्वी खेळाडूंचे सह्याद्री संस्थेचे चेअरमन ,माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, सेक्रेटरी लक्ष्मण कुटे, सह सेक्रेटरी दत्तात्रय चासकर, रजिस्ट्रार बाबुराव गवांदे ,स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन बाबासाहेब कडनर, व्हॉईस चेअरमन विठ्ठल गायकवाड, सर्व संचालक नारायण चत्तर, विनायक गुंजाळ, नानासाहेब चत्तर, दिनकर चत्तर, पांडुरंग फड,मधुकर गायकवाड, कैलास बाचकर, मुख्याध्यापक विलास नढे, अमृवाहिनी बँकेचे संचालक कचरू फड , बिरोबा दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन छबुराव फड , मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी आदिंनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

