वाचाल तर वाचाल, हा मूलमंत्र विद्यार्थ्यांनी जोपासावा – शेखर बो-हाडे

निमगाव जाळी / लोक वेध live न्यूज / अशोक गोसावी 

विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त थोर महापुरुषांची तसेच इतर अवांतर वाचन करुन आपले ज्ञान वटवृक्षाप्रमाणे वृध्दिंगत करुन आपल्या जीवनाची जडणघडण केली पाहिजे असे प्रतिपादन राजकीय विश्लेषक तसेच लेखक शेखर बो-हाडे यांनी सात्रळच्या रयत शैक्षणिक संकुल येथे झालेल्या वाचन प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमात केले. सदर कार्यक्रम कॉ.पी.बी.कडू.पाटील फौंडेशन संचलित अक्षर मानव वाचनालय वतीने आयोजित करण्यात आला होता.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम तसेच थोर स्वातंत्र सेनानी कॉ.पी.बी.कडू.पाटील तथा आप्पा यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक युवानेते पंकज कडू पाटील यांनी केले.तसेच रयत शैक्षणिक संकुलाचे उपशिक्षक विलास गभाले यांच्या स्वलिखित हुंकार कथासंग्रह पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.


याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शेखर बो-हाडे, सकाळचे पत्रकार सुहास वैद्य, शोभाताई कडू, युवा नेते पंकज कडू,अंनिसचे कार्याध्यक्ष मधुकर अनाप, संकुलाचे विद्यमान प्राचार्य राजेंद्र बडे, कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनिता निबे, भाऊसाहेब पेटकर, निकिताताई कडू, पर्यवेक्षिका सुशिला थोरात सचिन पवार अविनाश कडू आदि मान्यवर तसेच सेवकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अक्षर मानव वाचनालय प्रकल्पात 300 हून जास्त पुस्तके वाचणाऱ्या विद्यार्थ्यांचा व प्रकल्प प्रमुख सच्चिदानंद झावरे यांचा सत्कार मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास गभाले यांनी केले तर आभार प्रदर्शन तनिष्का कडू हिने मानले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!