सेंटेनरी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये बाल गोपाळ रमले दांडिया नृत्यात

संगमनेर / लोकवेध live न्यूज

शहरातील गोखले एज्युकेशन सोसायटीचे, सेंटेनरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शारदीय नवरात्री उत्सवानिमित्त प्राचार्य श्री निकम सी .एन यांच्या हस्ते देवीची विधिवत पूजा करून आरती करण्यात आली. तदनंतर विविध वेशभूषा करून आलेले छोट्या बालगोपाळांनी दांडिया नृत्य सादर केले. बालगोपाळांचे दांडिया नृत्य बघून सर्व शिक्षक व पालकही भारावून गेले. यावेळी छोट्या बालगोपाळांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते खाऊचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी संगमनेर सिन्नर सेंटरच्या अधीक्षक व पर्यवेक्षिका डॉ. सौ अस्मिता देशपांडे, जुनिअर कॉलेज इन्चार्ज प्रा. गुलाब गायकवाड , मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती मोनाली कोष्टी, मीना वाकचौरे, श्रीमती स्वप्नाली दळवी यासह पालक प्रतिनिधी जयश्री कवडे, सुनीता भालारे, कोमल नेहे, पूनम भडांगे, ज्योती सूर्यवंशी, मंगल नेहे, मनीषा वाणी, पूजा मुर्तडक, सुष्मिता मुर्तडक आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!