राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त पेटीट जुनियर कॉलेजमध्ये आरोग्य तपासणी
संगमनेर / लोकवेध live न्यूज
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सर डी एम पेटीट ज्युनिअर कॉलेजमध्ये प्राचार्य श्री आर.एच. मोकळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासन आयोजित जागरूक पालक व सुदृढ बालक उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी डॉ. सिद्धार्थ वाघमारे डॉ.रेखा शेटे
श्री.दिपक महाले, श्री. पावरा श्री. तळपाडे आणि श्रीमती विद्या साळवे या पथकाकडून करण्यात आली यावेळी प्रा. दशरथ गभाले सर आणि प्रा.परेश सांगवीकर सर यांनी नियोजन करून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते

तसेच कॉलेजमध्ये आज 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला यावेळी अमोल टेमक सर यांनी प्रास्ताविक केले तर प्रा. दशरथ गभाले प्रा. स्वप्निल शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. मिश्रा मॅडम प्रा.देशमुख मॅडम प्रा. चिमणकर मॅडम आणि श्रीम. खाटेकर मॅडम आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रा. सांगवीकर यांनी आभार मानले
