हॉटेल मान्यवर फॅमिली गार्डन रेस्टॉरंट चे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील संगमनेर शिबलापुर रोड वरती देवगाव जवळ राहणे परिवाराच्यावतीने हॉटेल मान्यवर फॅमिली गार्डन रेस्टॉरंट सुरू केले असून दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर त्याचे उद्घाटन आमदार बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले
यावेळी उपसभापती नवनाथ आरगडे गोरख कुटे आदीसह बाळासाहेब शिंदे शिवाजी शिंदे सुनील शिंदे चासकर सर गावंदे सर राजेंद्र कोटकर अशोकराव काळे दादासाहेब गुंजाळ लांडगे साहेब कारभारी नवले एडवोकेट मच्छिंद्र शिंदे संजय नवले सुरेश थोरात आदीसह रायते वाघापूर खराडी देवगाव व पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होतेमान्यवर हॉटेलचे मालक प्रवीण राहणे हे स्वतः इंजिनियर असून स्वतःच्या व्यवसायाला प्राधान्य देत ग्रामीण भागात सर्वसामान्य व्यक्तीला फॅमिलीसह हॉटेल ला जेवण करता येईल अशी व्यवस्था असलेली हॉटेलची गरज ओळखून त्यांनी हॉटेल व्यवसायाला प्राधान्य देत ग्रामीण भागात देवगाव येथे मान्यवर नावाने हॉटेल सुरू केले असून या ठिकाणी फॅमिली साठी स्वातंत्र्य व्यवस्था केलेली असून तसेच बर्थडे पार्टी हॉल ची व्यवस्था आहे या ठिकाणी अस्सल मराठमोळं जेवण आपल्याला मिळेल याची हमी हॉटेलचे मालक प्रवीण राहणे यांनी दिलीआलेल्या पाहुण्यांचे आर के राहणे सर वसंतराव राहणे किसनराव रहाणे राजेंद्र राहणे नितीन राहणे इंजिनीयर प्रवीण राहणे यांनी स्वागत सन्मान केला

