जरांगे पाटलांच्या उपोषणास संगमनेर शिवसेना तालुक्याच्या वतीने जाहीर पाठिंबा
संगमनेर लोकवेध live न्युज
संगमनेर शिवसेना तालुक्याच्या वतीने जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकनार आरक्षण मिळावं ह्या साठी उपोषण चालू आहे. त्या उपोषनास पाठिंबा म्हणून संगमनेर येथे सकल मराठा सामाजाने साखळी उपोषण चालू केले त्या उपोषणाला संगमनेर शिवसेना तालुक्याच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.
मराठा समाजाला आरक्षण मिळन्यासाठी अनेक वर्षांपासून प्रलंबित मागणी होती यापूर्वी मराठा समाजाच्या अनेक आंदोलनामध्ये आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने आमचा पाठिंबा होता.
मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण टिकावे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री.एकनाथजी शिंदे साहेब काम करत आहे.
मराठा समाजाला न्याय देण्याचे काम राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेबच देऊ शकतात असा आमचा विश्वास आहे.
मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणार आरक्षण मिळावे म्हणून आम्ही शासन दरबारी पाठपुरावा करणार आहे.
त्यावेळी उपस्तित….
शिवसेना तालुका प्रमुख रमेश काळे, सोमनाथ भालेराव(मागासवर्गीय सेल जिल्हा प्रमुख),बाळासाहेब व्यवहारे(वाहतूक सेना शहर प्रमुख), भूषण नरवडे(शहर संघटक), अमोल रनाते(शिवसेना उप शहर प्रमुख), अरुण उदमले(वाहतूक सेना तालुका प्रमुख), कमरली मन्सूरी(अल्पसंख्यांक शहर प्रमुख), योगेश जाधव(वाहतूक सेना उप तालुका प्रमुख), आकाश भास्कर(युवा सेना उप तालुका प्रमुख), पांडुरंग आडेप इत्यादी उपस्तित होते.

