पेटिट विद्यालयात राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शपथ
संगमनेर / लोकवेध live न्यूज
शहरातील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सर डी. एम. पेटिट विद्यालय व जुनिअर कॉलेजमध्ये भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करण्यात आली. संपन्न झालेले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य निकम सी.एन. उपस्थित होते. याप्रसंगी प्राचार्य निकम सी. एन. यांच्या हस्ते स्वर्गीय इंदिरा गांधी व सरदार वल्लभाई पटेल यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ शिक्षक विशाल गावित यासह इयत्ता सातवी ब चे श्रद्धा सदाफुले, शिवानी त्रिमुखे, चोपडा उर्वशी या विद्यार्थ्यांनी इंदिरा गांधी व सरदार वल्लभाई पटेल यांचे विषयी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य निकम सर यांनी अध्यक्ष मनोगतात स्वर्गीय इंदिरा गांधी व लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांचे देशासाठी योगदान व त्यांच्या कार्याची माहिती विशद करून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मतेविषयी शपथ दिली. या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षिका डॉ. अस्मिता देशपांडे, इन्चार्ज प्रा. गुलाब गायकवाड, जगदीश सावंत, गणेश कुलकर्णी, भूषण पाटील, अश्विता किनगे, ग्रंथपाल सांगळे के के, माणिक भडांगे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणाली अभंग व सायली कसाब यांनी केले. शेवटी उपस्थित सर्वांचे आभार सत्र प्रमुख अमोघ कुलकर्णी यांनी मानले.

