निळवंडे धरणातून पाणी आवर्तन सुरूच राहणार…
खा. सदाशिव लोखंडे

निळवंडे लाभधारक शेतकऱ्यांचे प्रयत्न यशस्वी

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

गेली 53 वर्षे रखडलेल्या निळवंडे प्रकल्पातून दुसऱ्या चाचणीच्या निमित्ताने 14 ऑक्टोबर रोजी पाणी सोडले गेले होते. लाभक्षेत्रात यंदा पाऊस कमी झाल्यामुळे पाण्याची परिस्थिती खुपच गंभीर आहे. अशातच अजूनही टेलच्या भागात वितरिकांचे काम बाकी आहे, त्यामुळे बंधारे व पाझर तलाव भरून द्यावे अशी टेलच्या शेतकऱ्यांची मागणी होती.
मात्र प्रस्थापीत राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष व प्रशासनाचा हलगर्जीपणा यामुळे पाणी 1 महिना सुरु असूनही व्यवस्थित नियोजन न झाल्यामुळे पाणी शेवटच्या व गरज असलेल्या लाभक्षेत्रात पोहचले नाही. या सर्व कारणांमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आक्रोश होता.
याचीच दखल घेत शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खा. सदाशिव लोखंडे यांनी शिर्डी येथे बैठक घेतली होती तसेच चिंचोली गुरव येथे शेतकरी व जलसंपदा विभाग अधिकारी यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा घेत हा प्रश्न सोडवण्याचा शब्द दिला होता.

काल दि. 13 नोव्हेंबर रोजी खा. लोखंडे यांनी महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेत, येथील परिस्थितीचे गांभीर्य सांगून पाणी वाढवून देण्याची मागणी केली. मा. मुख्यमंत्री यांनी याची तात्काळ दखल घेत संबंधित सचिव यांना त्वरित फोन द्वारे सुचना केल्या आहे. त्यामुळे पुढील काही दिवस निळवंडे धरणातून पाणी सुरूच राहून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा नक्कीच उपयोग होणार आहे.

गेली 5 दशके रखडलेला निळवंडे प्रकल्प खा. मा.सदाशिव लोखंडे साहेब यांनी मार्गी लावला. पाणी सुटल्यावर देखील आता अनेक प्रश्न निर्माण होत आहे पण ह्या प्रत्येक प्रश्नाला एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे खा. लोखंडे साहेब असा ठाम विश्वास आता लाभधारक शेतकऱ्यांमध्ये झाला आहे.
पाणी वाढवून दिल्याबद्दल तमाम लाभधारक शेतकऱ्यांच्यावतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब व खा. लोखंडे साहेब यांचे मनःपूर्वक धन्यवाद..
कमलाकर कोते
जिल्हाप्रमुख अ नगर शिवसेना
विठ्ठल रावसाहेब घोरपडे
सचिव – निळवंडे पाटपाणी कृती समिती
जिल्हा संघटक -शिवसेना
रमेश धोंडिबा काळे
शिवसेना तालुका प्रमुख, संगमनेर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!