मोठी बातमी! गौतमीच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी धक्कादायक माहिती समोर….
संगमनेर लोकवेध live न्युज
डान्सर गौतमी पाटील हिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गौतमी पाटीलला कळता तिच्या चेंजिंग रुममध्ये एक आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करण्यात आला आणि तो व्हिडीओ जाणीवपूर्वक सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. आता व्हायरल व्हिडीओ प्रकरणाविषयी एकमहत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता पोलीस देखील अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. याच व्हिडीओ प्रकरणी सोशल मीडियावरील वातावरण तापलं आहे. अनेकांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे..
दरम्यान, पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एका महिलेने याबाबत तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला आणि सहकाऱ्यांचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचंही सांगण्यात आले आहे. हा व्हिडीओ काहींनी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.
पोलीस याबाबत आता सखोल चौकशी करीत
आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी ट्विट करीत या विषयावर प्रतिक्रिया दिला आहे. याप्रकरणी आता पोलीसही कामाला लागले आहेत. पोलिसांनी आरोपींविरोधात कारवाई करण्यास सुरुवात देखील केल्याची माहिती समोर आली
आहे. पोलीस तपास सध्या करत आहेत. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, गौतमीचा एका कार्यक्रमादरम्यान कपडे बदलतानाचा व्हिडिओ चित्रीकरण करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता.
यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
तिच्या चाहते देखील संतप्त झाले आहेत. पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान गौतमी सोबत ही धक्कादायक घटना घडली होती.
याबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या, महिलांबाबतचे सायबर गुन्हे रोखण्याकरिता कृती कार्यक्रम जाहीर करावा असे महिला आयोगाने सायबर विभाग, पोलीस महानिरीक्षक यांना पत्राद्वारे कळवले आहे, याबाबत कारवाई केली जाणार आहे.
नेमका प्रकार काय?
पुण्यातील एका स्टेज शो दरम्यान कपडे बदलताना गौतमी पाटील (Gautami Patil Video Viral) हिचा आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होतोय. गौतमी पाटीलची लोकप्रियता वाढता असताना तिला बदनाम करण्यासाठी हा घृणास्पद प्रकार केल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. या प्रकारावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळतायेत.