3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन तसेच ५% दिव्यांग हक्क निधी वाटप कार्यक्रम घुलेवाडी येथे उत्साहात संपन्न
संगमनेर / लोकवेध live न्यूज
घुलेवाडी गावातील दिव्यांग बंधू भगिनींना ग्रामपंचायतीच्या एकुण उत्पन्ना पैकी 5% टक्के निधी मिळावा यासाठी विशेष प्रयत्न करणारे अपंग सहाय्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय श्री जालिंदर लहामगे साहेब यांनी दिव्यांगांना 5% टक्के निधी मिळवून देण्यासाठी निस्वार्थ भावनेने विशेष परिश्रम घेतले त्याबद्दल त्यांचा घुलेवाडीतील सर्व दिव्यांग बांधवांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. तसेच दिव्यांगांना निधी देण्याकरिता ग्रामपंचायत घुलेवाडी च्या लोकनियुक्त सरपंच सौ.निर्मलाताई राऊत व नवनिर्वाचित ग्रामसेवक श्री राकेश पाटील यांनी विशेष पुढाकार घेऊन गावचे उपसरपंच दत्तू राऊत व सर्व सदस्यांच्या सहमतीने तात्काळ ठराव मंजूर करुन ३डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून दिव्यांग बांधवांच्या हक्काचे ५%निधी (एकुण ₹6 लाख 7हजार रु.) वाटप करण्यात आले.त्याबद्दल सरपंच ताई, ग्रामसेवक, उपसरपंच व सर्व सदस्यांचा दिव्यांग बांधवांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी अनमोल असे मार्गदर्शन,मनोगत,व्यक्त करून दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
घुलेवाडी ग्रामपंचायतीच्या या अविस्मरणीय उपक्रमाबद्दल दिव्यांग बांधवांनी समाधान व आनंद व्यक्त केला.
यावेळी शिवसेना दिव्यांग सहाय्य सेना संघटनेचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय श्री जालिंदर लहामगे साहेब,दिव्यांग कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष श्री राजू मारुती आव्हाड सर,
दिव्यांग कर्मचारी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष श्री.शिवाजी आव्हाड सर,प्रहार दिव्यांग शासकीय- निमशासकीय कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनिल अभियेकर सरप त्रकारश्री गोरक्ष नेहे,दिव्यांग सहाय्य सेना तालुकाध्यक्ष आनंदराव खरात सर,दिव्यांग सहाय्य सेना उपाध्यक्ष बाबासाहेब कोकणे,शहराध्यक्ष कैलास उदावंत,नवनिर्वाचित महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ.पौर्णिमा आढाव उपतालुका अध्यक्षा सौ.उर्मिला कोहोकडे,तालुका महीला शहर अध्यक्षा श्रीम कविता सुर्यवंशी,श्री अविनाश ढमाले,अनिल राऊत रवि गिरी,.संंजू खर्डे.सिताराम पानसरे,गोरक्षनाथ कांबळे,देव्हारे गुरुजी,प्रदीप कांबळे सर,तसेच विविध दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ व लाभार्थी दिव्यांग बंधु- भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
????????♿????????♿????????♿????????♿????????♿????????♿
