शासनाने संगमनेर डोंगरी जिल्हा करण्याचे धोरण घोषित करावे – देशमुख
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर डोंगरी जिल्हा म्हणून घोषित करावा यासाठीची मागणी
मा. नामदार देवेंद्रजी फडणविस साहेब, उपमुख्यमंत्री मा. नामदार अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री मा. नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, महसुलमंत्री तथा पालकमंत्री अहमदनगर यासह जिल्ह्यातील सर्व आमदारांना ही संगमनेर जिल्हा व्हावा यासाठी निवेदन दिले आहेत.सामाजिक कार्यकर्ते आत्माराम देशमुख यांनी प्रसिद्ध दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की
पुणे, नाशिक, मुंबई, अहमदनगर या मध्ये संगमनेर शहर जुन ऐतिहासिक शहर जे आढाळा प्रवरा म्हाळुंगी तिरावर वसलेले आहे. अहमदनगरला सन १८५४ ला नगरपालीका स्थापन झाली तर संगमनेरला सन १८५८ साली मात्र प्रत्येक्षात कामकाज सन १८६० साली सुरू झाले संगमनेर हे अहमदनगरच्या बरोबरीचे शहर आहे त्यामुळे संगमनेर हे तत्काळ जिल्हा म्हणुन अस्तिवात आणावा ही नम्र विनती नामदार राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री तथा महसुलमंत्री म्हणून ताबडतोब नियमानुसार रितसर संगमनेर डोंगरी जिल्हा करणेचे धोरण अंगीकार करावे
संगमनेर डोंगरी जिल्हा डावलून अन्य पारसलीटी केल्यास आंम्ही संगमनेरकर व
अकोलेकर दोन्ही कालवे बंद करु याची गंभीर दखल नामदार राधाकृष्ण विखेपाटील यांनी घ्यावी. होणारे परिणामाची जबाबदारी ही शासनावर राहील.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्रपणे अभिवादन उठा शिका संघटित व्हा न्यायासाठी संघर्ष करा तात्काळ संगमनेर डोंगरी जिल्हा म्हणून घोषित करा आता होणारे हिवाळी अधिवेशनात म्हणून घोषित होईल ही अपेक्षा व नम्र विनंती(आत्माराम गजानन देशमुख )
