पुस्तकांसाठी घर बांधनारे डॉ बाबासाहेब आंबेडकर  पहिले विद्वान होते – मंजाबापू साळवे
पिंपरणेत महापरिनिर्वाण दिनानिमीत्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
 पिंपरणे / लोकवेध live न्यूज 
सर्वधर्म समभाव समता व बंधुता हा राज्यघटनेचा आत्मा आहे तर प्रज्ञा शिल करूणा हा संगम मानवाचा आत्मा आहे  बाबासाहेब नेहमी म्हणत मानवता हाच खरा धर्म आहे बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच आज विविध जाती धर्म, संस्कृती विविथ भाषा, असलेला देश एकसंध राहिला भारताचे संविधान हे जगातील सर्वश्रेष्ठ महाग्रंथ आहे या महामानवाने सत्याची साथ कधीही सोडली नाही आपल्या तत्वांशी ते शेवट पर्यंत एकनिष्ठ राहिले असे प्रतिपादन लहुजी सेना जिल्हाध्यक्ष मंजाबापू  साळवे  यांनी केले
संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे  भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वान दिना निमित्त बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले
यावेळी पो पाटील विनोद साळवे, लहुजी सेना जिल्हाध्यक्ष मंजाबापु साळवे  तंटामुक्ती अध्यक्ष  अरुण देशमुख शिवराम वाकचौरे गंगाराम वाकचौरे  सोसायटीचे चेअरमन ज्ञानदेव राहींज भास्कर साळवे दत्तू वाकचौरे पोपट साळवे  राजेंद्र आरणे साळवे भीमा राहिंज रवींद्र देशमुख कांताराम भालेराव रामदास भालेकर  सुदाम वाघमारे  राजेंद्र बागुल सुरेश बागुल किरण बागुल प्रदीप मांडे रामनाथ ठोंबरे सोपान साळवे लक्ष्मण राहिंज
 आदी उपस्थित
यावेळी मंजाबापू साळवे  म्हणाले की बाबासाहेबांच्या विचारांची आज देशाला गरज आहे फक्त तळागाळातील किंवा मागासवर्गीय समाजासाठी त्यांचे कार्य नव्हते तर समस्थ मानवजाती साठी त्यांचे कार्य होते बाबासाहेबांना डोक्यावर नाही तर डोक्यात घेण्याची वेळ आली आहे ते नेहमी म्हणत मानवाने चार गोष्टी कमवाव्यात एक अन्न, वस्त्र, निवारा, आणि पुस्तक पुस्तकांसाठी घर बांधनारे पहिले विद्वान होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!