धांदरफळखुर्द मध्ये एका गुंठ्यात 300 देशी वृक्षाची लागवड.

 संगणमेर तालुक्यातील  ५० गावांमध्ये उपक्रम ; तापमान कमी होण्यासाठी होणार मदत

संगमनेर / लोकवेध live न्यूज

सप्रेम या संस्थेच्या माध्यमातून भारतातील मियावाकीचा पहिला प्रकल्प संगमनेर तालुक्यातील पन्नास गावांमध्ये राबविण्यात आला आहे. त्यामुळे या माध्यमातून दोन टक्के गावांमधील तापमान कमी होणार आहे. तर पशु-पक्ष्यांनाही याचा चांगला फायदा होत असून मियावाकी प्रकल्पाच्या माध्यमातून वृक्षांची संख्याही वाढली आहे, अशी माहिती प्रकल्प समन्वयक हिमांशू लोहकरे यांनी दिली.

कल्याण- मुंबई येथील सप्रेम संस्थेच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील १४७ गावांपैकी पळसखेडे, तिगाव, करूले, तळेगाव दिघे, झोळे, धांरफळ खुर्द, पिंपळगाव कोंझीरा, सावरचोळ, हिवरगाव पठार, घारगाव निमज,सांगवी यांसह पन्नास गावांमध्ये हा मियावाकी प्रकल्प राबविण्यात आला आहे. एका गुंठ्यात तीनशे झाडे लावण्यात आली आहेत. हिरडा, बेहडा, चिंच, आवळा, वड, पिंपळ, नागकेशर आदी ४२ प्रकारची झाडे लावण्यात आली आहे. जवळपास पाच ते सहा फूट उंच झाडे झाली आहेत. विशेष बाब म्हणजे या झाडांमुळे गावातील तापमानही कमी होणार असून पशु-पक्ष्यांनाही याचा मोठा फायदा होणार आहे. गटविकास अधिकारी अनिल नागणे यांच्या मार्गदर्शनाखाली पन्नास गावांमध्ये हा मियावाकी प्रकल्प राबविण्यात आला आहे.

या मियावाकी प्रकल्पाची सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, कर्मचारी हे सर्वजण चांगली काळजी घेत आहे. विशेष बाब म्हणजे पन्नास गावांमधील मियावाकी प्रकल्प अतिशय चांगले असल्याचे दिसून आले आहे. काही गावांमध्ये पाण्याची कमतरता असताना देखील तेथील ग्रामपंचायतीने या प्रकल्पाची चांगली काळजी घेतली आहे. मियावाकी प्रकल्पामुळे पन्नास गावांमध्ये वृक्षांची संख्याही वाढणार आहे.भारतातील पहिलाच मियावाकीचा प्रकल्प हा संगमनेर तालुक्यातील पन्नास गावांमध्ये सप्रेम या संस्थेने राबवला आहे.त्यामुळे या प्रकल्पाचा पन्नास गावांना भविष्यात चांगला फायदा होणार असल्याचे प्रकल्प समन्वयक हिमांशू लोहकरे यांनी नमूद केले आहे.

संगमनेर पंचायत समिती पासूनच आम्ही मियावाकी प्रकल्पला सुरूवात केली आहे.मोकळ्या जागेत आम्ही जवळपास तिनशे वृक्षांची लागवड केली आहे.आज पन्नास गावांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. यामध्ये शासनाचा एकही रुपया नसून लोकसहभाग व ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू आहे. त्यामुळे पर्यावरणासंदर्भात लोकांमध्ये जनजागृती होणार आहे.

अनिल नागणे( गटविकास अधिकारी)

 

डॉर्फ केटल जंगल कप स्पर्धा २०२३ या माध्यमातून ज्या पन्नास गावांनी हा मियावाकी प्रकल्प राबवला आहे, त्यांच्यासाठी प्रथम पुरस्कार १ लाख, व्दितीय ७५ तर तृतीय ५० हजार असे पुरस्कार दिले जाणार आहे. विशेष बाब म्हणजे वृक्ष-वृक्षांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. भारतातील पहिलाच मियावाकीचा प्रकल्प हा सप्रेम संस्थेने संगमनेर तालुक्यात राबवला आला आहे.

हिमांशू लोहकरे (मियावाकी प्रकल्प- सन्मवयक)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!