कै.बापूसाहेब शेंडे स्मृतीचषक तालुकास्तरीय समुहगीत गायन स्पर्धा संपन्न.
कातळापुर विदयालय स्मृतीचषकचे मानकरी.
पिंपळगाव नाकविंदा / लोकवेध live newj
सत्यनिकेतन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै.बापूसाहेब शेंडे यांनी आदिवासी समाजाच्या शैक्षणिक,सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे उचित स्मरण व्हावे म्हणून त्यांच्या नावाने समुहगीत गायन स्पर्धा दरवर्षी संपन्न करण्यात येते.याचप्रमाने याही वर्षी कै.बापूसाहेब शेंडे स्मृतिचषक आंतरविद्यालयीन तालुकास्तरीय समुहगीत गायन स्पर्धा सत्यनिकेतन संस्थेचे गुरूवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय राजूर येथे संस्थेचे जेष्ठ संचालक मिलिंदशेठ उमराणी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न करण्यात आली.
याप्रसंगी विचार मंचावर संचालक विजय पवार,माजी प्राचार्य लहानु पर्बत,प्राचार्य भाऊसाहेब बनकर,बादशहा ताजणे,पर्यवेक्षक सदाशिव गिरी यांसह तालुक्यातील विविध विदयालयातील शिक्षक,विदयार्थी,विभागप्रमुख उपस्थित होते.तालुक्यातील सहभागी विदयालयातील स्पर्धकांनी देशभक्तीपर समुहगीत सादर केले. या स्पर्धांचे परिक्षण अॅड.एम.एन.देशमुख कॉलेजचे प्रा.अतुल शालिग्राम व प्रा.दीपक धोक्रट यांनी केले.या समुहगीत गायन स्पर्धांमध्ये सत्यनिकेतन संस्थेचे नानासाहेब विठोबा देशमुख सर्वोदय विदया मंदिर कातळापुर या विदयालयास प्रथम क्रमांक मिळाला असून हे विदयालय स्मृतीचषकाचे मानकरी ठरले.तसेच अभिनव पब्लिक स्कुल व वसुंधरा अकॅडमि अकोले यांना द्वितीय क्रमांक तर सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय खिरविरे यांना तृतिय क्रमांक मिळाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संचालक मिलिंदशेठ उमराणी यांनी व्यक्तीच्या सर्वांगिन विकासासाठी पुस्तकी ज्ञानाबरोबरच इतरही स्पर्धांचे ज्ञान असने गरजेचे असते.त्यासाठी शालेय जिवनात विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन स्पर्धा परिक्षांची देखील तयारी ठेवणे महत्त्वाचे आहे.प्रत्येक क्षण आनंदी राहूनच शिकायचा असतो. त्यासाठी सकारात्मक विचारांची उंची वाढवा.आपले जिवनातील उद्दिष्ट पूर्ण करा. असे विचार प्रतिपादित केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य भाऊसाहेब बनकर यांनी केले.सुत्रसंचलन प्रा.संतराम बारवकर यांनी केले तर प्रा.बीना सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले.
स्पर्धा यशस्वीतेसाठी विभागप्रमुख सदाशिव गिरी,राजेविनोद साबळे,किशोर देशमुख,बीना सावंत, संतराम बारवकर यांसह सर्व संगित शिक्षक आदिंनी परिश्रम घेतले.स्पर्धांतील गुणवंत स्पर्धक तसेच मार्गदर्शक शिक्षक यांचे सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अॅड.मनोहरराव देशमुख,सचिव टी.एन.कानवडे,कोषाध्यक्ष विवेकजी मदन यांसह सर्व संचालक आदींनी अभिनंदन केले.तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
