कोळेवाडी मुक्कामाहून संगमनेरला जाणारी एसटी बस पिंपरणे येथे पुलावरून कोसळली

 सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
 पिंपरणे / लोकवेध live न्यूज 

संगमनेर ते  कोळेवाडी गाडी नंबर MH 07 सी  9146 ही एसटी बस कोळेवाडी  या ठिकाणी काल  मुक्कामी गेली होती ती पुन्हा सकाळी संगमनेर कडे  खांबा वरवंडी शिबलापुर हंगेवाडी  मार्गे संगमनेरला जात असताना पिंपरणे पुलावरून खाली कोसळली सुदैवाने कोणताही अनर्थ घडला नाही प्रवासी  किरकोळ जखमी झाले आणि  नशीब बलवत्तर जवळच असलेल्या ट्रान्सफरवर कोसळली नाही  नाहीतर मोठा अनर्थ घडला असता

सदर घटना सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली बस चालक  गागरे मनोहर कंडक्टर एस एस बर्डे हे दोघे किरकोळ जखमी झाले एसटी बस कोसळली त्यावेळेस बस मध्ये 70 च्या आसपास प्रवासी प्रवास करत होते  48 प्रवासी तिकीटधारी पासवाले  15 ते 20 असतील असे असतील एस एस बर्डे यांनी सांगितले

 यावेळी संगमनेर तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ढुमणे साहेब यांनी घटनास्थळी भेट दिली व जखमीची चौकशी केली
जखमींना पुढील उपचारासाठी संगमनेर येथे हलविण्यात आले अपघातग्रस्तांना  गावातील तरुण पोलीस पाटील विनोद साळवे सरपंच नारायण मरभळ मंज्याबापू साळवे संदीप साळवे ऋषी साळवे संजय बागुल राजहंस संघाचे संचालक  रवींद्र रोहम गोकुळ काळे निलेश बागुल कंडक्टर अरुण वाकचौरे राजेंद्र देशमुख अजित मांडे सागर बागुल  व ग्रामस्थांनी मदत केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!