पानोडी वळणदार घाटात टाटा एसी झीप गाडी – मोटरसायकलचा भीषण अपघात, एकजण गंभीररित्या जखमी
आश्वी / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील पुर्व व पठार भागाला जोडणारा आश्वी – साकूर मार्गावरील येथील पानोडी तील वळणदार घाटात टाटा एसी झीप गाडी आणि मोटरसायकलचा भीषण अपघात झाला. यामध्ये मोटार सायकलस्वार गंभीररित्या जखमी झाला त्याला पुढील उपचारा करिता प्रवरा ग्रामिण रग्णालयात दाखल करण्यात आले .
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुधवार दि.२७ डिसेबर २०२३ रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास प्रणव दिनकर शिंदे (वय- ४०) हा वरवंडीच्या दिशेने मोटरसायकलवरून (एम.एच १७ बी . पी . ४८२२ ) जात होते. त्यावेळी टाटा एसी झीप गाडी (एम.एच. १५ जी ०५०६ ) दुधाचे कॅन घेऊन आश्वी – पानोडीच्या दिशेने जात असताना पानोडी वळणदार घाटात ठाकरवाडी रस्त्या समोरील वळणावर भीषण अपघात झाला. यात मोटर सायकलस्वार प्रणव दिनकर शिंदे गंभीररित्या जखमी झाला .
प्रणव शिंदे यांच्या डोक्याला तोडाला जबरदस्त मार लागला असून गाडीच्या काच फुटल्याने काचाही तोडाला लागल्या असल्याचे प्रथम दर्शनी दिसले त्यांना लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले तर पीकअप ही ढेंबरे यांच्या मालकीची असून त्याला वर असणारा ड्रायव्हर पिक अप जागेवरच सोडून फरार झाला . चालकाविरोधात फिर्याद दाखल झाली असून पुढील तपास आश्वी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे
पानोडी वळणदार घाटात रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात झाडा – झुडपे वाढल्याने वाहन चालकांना समोरु येणार्या वाहनाचा अंदाज येत नसल्यानेचं अपघाताचे प्रमाण वाढताना दिसत आहे तर अपघात झाल्यानंतर जखमीला रुग्णालया घेवून जाण्याकरिता २५ – ३० मिनिटाचा मदतीचा वाट बघावी लागली .
