ज्येष्ठतम नेते शरद पवार यांच्या अरुण कडू पा. यांच्या भेटीने दिले प्रवरेच्या राजकारणात भावी महारणनीतीचे संकेत
निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज / अशोक गोसावी
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी नुकतीच अमरावती येथे जाऊन प्रहारचे नेते आ.बच्चू कडू यांची भेट घेत एक राजकीय धुरळा उडून दिला होता. त्यानंतर त्यांनी कालच प्रवरेच्या शेतकरी मंडळाचे नेते अरुण कडू पाटील यांची मुद्दामहून भेट घेत नवीन भावी राजकीय घडामोडीचे संकेत दिले.
शरद पवार आश्वी येथे आर.पीआय कार्यकर्त्याच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी आपल्या नियोजनाच्या बाहेर जाऊन सात्रळ येथे अरुण कडू पा.यांच्या घरी चहापानाच्या कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली.
खरे तर आश्वीचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर सरळ शिर्डीला न जाता त्यांनी काहीशी वाकडी वाट करून अरुण कडू यांच्या सात्रळ गावी त्यांच्या वस्तीवर जाऊन चहापानासाठी हजेरी लावली. त्यामुळे या भेटीची चर्चा आता वेगळ्या अर्थाने वळण घेत आहे.प्रवरेच्या स्थानिक राजकारणाचे काही संकेत यात असू शकतात.*तसेच अहमदनगर जिल्ह्याचे नेतृत्व अरुण कडू पाटील यांच्याकडेही जाऊ शकते कारण नवीन पक्ष बांधणीसाठी एक कुशल व संघटनात्मक नेतृत्व हे अरुण कडू पाटीलच देऊ शकतात ही पवार साहेबांची खात्री झाली असेल*.एस काँग्रेसच्या स्थापनेच्या नंतर प्रवरा परिसरातील शेतकरी मंडळ हे पवार साहेबांच्या बरोबरच होते. कम्युनिस्ट पक्षात असूनही अरुण कडू यांचेही संबंध एस काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते आणि पवार साहेबांशी विशेषत्वाने होते. 1992 साली बाबुराव दादा तनपुरे यांच्या आग्रहावरून अरुण कडू यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर ते जिल्हा परिषद अध्यक्षही झाले. या त्यांच्या अध्यक्षीय निवडीसाठी तत्कालीन ज्येष्ठ नेते शंकरराव काळे, मारुतरावजी घुले, भाऊसाहेब थोरात यांनी बाबुराव दादा तनपुरे यांच्या आग्रहाला मान देऊन अरुण कडू यांची जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड केली. त्यानंतर अरुण कडू यांचे पवार साहेबांची अत्यंत घनिष्ठ संबंध प्रस्थापित झाले. याच कालावधीत अरुण कडू यांची निवड शंकरराव काळे व रावसाहेब शिंदे यांच्या आग्रहास्तव रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय सल्लागार समितीच्या अध्यक्षपदीही निवड झाली.ह्या पदावर अरुण कडू 23 वर्ष होते. हृदयशास्त्रक्रियेनंतर या पदावरून अरुण कडू यांनी निवृत्ती स्वीकारली.परंतु त्यानंतरही अरुण कडू यांची रयत शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षपदी पवार साहेबांनी निवड कायम ठेवली. अरुण कडू यांचे पिताश्री कॉम्रेड पी बी कडू पाटील यांच्या अमृत महोत्सव समारंभासाठी शरद पवार आवर्जून सात्रळ येथे उपस्थित होते. त्यानंतर कडू पाटील यांच्या निधनानंतर प्रथम स्मृती दिनानिमित्तही पवार साहेब यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या व इतर अनेक प्रसंगानंतर अरुण कडू यांचे पवार साहेब यांच्याशी जे संबंध वृद्धिंगत आहेत ते अनेक वेळा अधोरेखित झाले आहेत. आता राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार साहेब येथील परिसरातील कार्यकर्त्यांशी पूर्वीप्रमाणेच संपर्क ठेवून असणार आहेत हे कालच्या शरद पवार यांच्या सात्रळ येथील अरुण कडू यांच्या निवासस्थानी झालेल्या चहापानाच्या भेटीनेअधोरेखित करत नवीन राजकीय समीकरणाचे संदेश दिले आहे.
