पोदार इंटरनॅशनल विद्यालय ओझर येथे ‘ सावित्रीबाई फुले जयंती’ साजरी
नाशिक / लोकवेध live न्यूज
जिच्यामुळे शिकली दीनदुबळ्यांची मुले, ती ज्ञानदाती, ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, सावित्रीबाई फुले ।। अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती पोदार इंटरनॅशनल स्कूल ओझर विद्यालयात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जसिंथा पारके, विशाल मेंढे, श्रावणी कमुजु, वैशाली वाघ आणि समन्वयक शिक्षिका यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करण्यात आले. विद्यालयातील शिक्षिका भाग्यश्री बुरघाटे यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची महती विद्यार्थ्यांना पटवून दिली. विद्यालयातील विद्यार्थी सत्यम गुप्ता याने सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जसिंथा पारके यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
