पेटिट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

संगमनेर / लोकवेध live न्यूज

शहरातील गोखले एज्युकेशन सोसायटीचे सर डी एम पेटिट हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. प्रारंभी कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ कवी व माजी मुख्याध्यापक श्री रमेश शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी प्राचार्य सी एन निकम यासह संगमनेर सिन्नर सेंटरच्या अधीक्षिका व पर्यवेक्षिका डॉ. अस्मिता देशपांडे, इन्चार्ज प्रा. गुलाब गायकवाड, सत्र प्रमुख प्रकाश वनम, अमोघ कुलकर्णी प्रा. शिंदे एस व्ही उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ कवी रमेश शिंदे यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातील स्पर्धकांना शुभेच्छा देताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर कलागुणांचा विकास करावा. जीवनात कोणता तरी एक छंद किंवा कला जोपासावी. कलेमधूनच व्यक्ती मोठा होत असतो असे पटवून दिले. अध्यक्ष मनोगतात प्राचार्य निकम म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अभ्यासा व्यतिरिक्त आपल्यातील सुप्त गुणांना वाव द्यावा. शालेय जीवनात जे विद्यार्थी रंगमंचावर कला सादर करतात असेच विद्यार्थी पुढे चांगले नागरिक व कलाकार होतात. या संस्कृतीक कार्यक्रमांमध्ये देवा श्री गणेशा– देवा श्री गणेशा–, दैवत छत्रपती न आमचे, दैवत छत्रपती, आमच्या पप्पांनी गणपती आणला, झगमग – झगमग रात सजली या व अशा अनेक गीतांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या सांस्कृतिक कार्यक्रमांचे परीक्षण श्री रमेश शिंदे सर व प्रा. सुनीता शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रकाश वनम व योगेश देसले यांनी केले. या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख किशोर बांडे, जगदीश सावंत, भूषण पाटील, उमेश गुंजाळ, मदन जेधे, बी डी पाटील, अश्विता किनगे, गणेश कुलकर्णी आदींसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या वेळी कार्यक्रमासाठी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!