कोडींग हॅकेथॉन स्पर्धे मध्ये ठाकरवाडी विठे शाळेची ची उत्तुंग भरारी.

अकोले / लोकवेध live न्यूज 

नगर येथे झालेल्या कोडींग हॅकेथॉन स्पर्धा मध्ये जि. प. प्राथमिक शाळा ठाकरवाडी (विठे) च्या विध्यार्थ्यांनी जिल्ह्यात 6 वा क्रमांक मिळवीत उत्तुंग यश मिळवले आहे.
नगर येथे 4 व 5 जानेवारी 2024 रोजी या स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत शाळेचे विद्यार्थीनी साईशा दत्तात्रय वाकचौरे, अस्मिता भागवत उघडे, शारदा नामदेव उघडे यांनी सहभाग घेतला. या विध्यार्थ्यांना विज्ञान शिक्षिका स्मिता धनवटे यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेतील विजया बद्दल शाळेला टॅबलेट, प्रशस्तीपत्र, 500 रु रक्कम देऊन सन्मानित करणयात आले.
कोडींग हॅकेथॉन स्पर्धेसाठी नगर जिल्ह्यातून 200 शाळेची सुमारे 5000 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. यात पहिला टप्पा हा अनप्लग आव्हानाचा होता. यामध्ये आदिवासी भागातील ठाकरवाडी शाळेने भरारी गाठत नेत्रदीपक यश मिळवत जिल्ह्यातील 12 शाळेत व 36 विद्यार्थ्यांत स्थान मिळवले. दुसऱ्या टप्प्यात 6 वा क्रमांक मिळवत उत्तुंग भरारी मारली.
विज्ञान शिक्षिका स्मिता धनवटे यांनी या स्पर्धे विषयी बोलताना सांगितले की, ठाकरवाडी ही आदिवासी भागातील शाळा असून येथे कोणत्याही प्रकारची सुविधा नसताना हे यश मिळाले आहे. ज्या विध्यार्थ्यांना संगणक, लॅपटाप, माउस याचे ज्ञान च नव्हते, यात खेळामध्ये बिबटया व जंगली प्राणी गाव व शहरऐवजी परत जंगलात राहायला जातील असा बनवला व तो परीक्षकांच्या पसंतीस आला. विध्यार्थ्यांची आदिवासी ठाकरी भाषा असताना ही हे यश कौतुकास्पद आहे. या स्पर्धेतील इतर शाळा ज्यांचे कडे सुसज्ज संगणक कक्ष, पूर्णवेळ शिक्षक असताना हे विध्यार्थी जिल्ह्याच्या ठिकाणी चमकले.
बक्षीस वितरण शिक्षण अधिकारी भास्कर पाटील, डीआयइटी चे कार्यक्रम अधिकारी प्रो.लोटके, विस्तार अधिकारी श्रीमती कारले, मैत्री संस्थेचे गुगळे, रयत शिक्षण संस्थेचे अधिकारी यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. या स्पर्धेसाठी शाळेचे मुख्याध्यापक सुधीर बोऱ्हाडे, उपाध्यापक नामदेव बांडे, नंदू नाडेकर यांनी प्रोत्सहान दिले. गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, गटशिक्षणाधिकारी अभयकुमार वाव्हळ, विस्तार अधिकारी सविता कचरे, केंद्रप्रमुख स्वाती अडाणे सर्व पालक, शालेय व्यवस्थापन समिती चे सदस्य यांनी शाळेचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!