अहमदनगरचे विभाजन करून संगमनेर जिल्हा करा – सामाजिक कार्यकर्ते आत्माराम देशमुख
 संगमनेर / लोकवेध live न्यूज 
 अहमदनगर जिल्ह्याचे तात्काळ विभाजन करा संगमनेर जिल्हा म्हणून घोषित करा अशी मागणी संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील सामाजिक कार्यकर्ते आत्माराम देशमुख यांनी मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य डॉक्टर नितीन जी करीर यांना निवेदन दिले आहे
 त्यांनी निवेदनात पडले आहे की
आपण अप्पर महसूल सचिवही होता. आपण लोणीचे म्हणजेच अहमदनगरचे सुपूत्र लोणीने संगमनेर भाग सहकारी साखर कारखाना उभारला व सुरु केला. कित्येक राज्यांना लाजवेल एवढे क्षेत्रफळ अहमदनगरचे कार्यक्षेत्र १७,५०० चौ कि अहमदनगर पेक्षा निम्मपट क्षेत्र असणारे १० जिल्हयाचे विभाजन केले. म्हणजेच आमचेवर अन्याय अत्याचार केला. जनता व प्रशासन यांची मोठी कुचंबणा केली. विकासापून दूर ठेवले गैरसोय निर्माण केली. मग तुमचा मुख्य सचिवाचा / आय.ए. एस. चा दर्जा काय कामाचा ? वास्तविक तुम्ही मुख्यमंत्र्याला व सहकारी मंत्र्यांना सांगायला पाहिजेत. म्हणजेच तुमचा इतिहास भूगोल कच्चा, तुमचा आय. ए. एस चा दर्जा जनता व प्रशासन यांच्या काय कामाचा ?
संगमनेर तालुक्यास चार आमदार, ते नुसती लपवालपवी करतात. शिर्डी, श्रीरामपूर, बाभळेश्वर- संगमनेर असे दिशाभूल करतात. याचे उत्तर अहमदनगरचा इतिहास व भुगोल. सरकारात नाही काय ? याचे उत्तर सोम्या गोम्याला द्यावेच लागेल. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हक्क दिलाय. श्रीरामपूर ५६ गावांचा तालुका, राहाता ६८ गावांचा, कोपरगांव ८१, राहुरी १०० गाव, संगमनेर १७१ गावे, २४० पेक्षा वाडया वस्त्या, अकोले १९१ गावे, ३०० पेक्षा वाडया वस्त्या याचे विभाजन कोण करणार? जनता व प्रशासन यांना कोण न्याय देणार ? जर आमदार लोक न्याय देणार नसेल तुम्ही पण न्याय देणार नसाल तर कोणाकडे जायचे ? मग मुकी बिचारी कुणी हाका मग तुमचा आय.ए.एस.चा दर्जा काय कामाचा ? तरी तात्काळ दखल घेनून संगमनेर डोंगरी जिल्हा सुरु करावा. महाकाय संगमनेर अकोल्याचे विभाजन करुन जनता व प्रशासन यांना न्याय द्यावा ही विनंती.
स्वर्गीय विलासराव देशमुख हे उस्मानाबाद जिल्हा परिषद सदस्य यांनी उस्मानाबादचे विभाजन करुन लातूर जिल्हा सुरु केला. तो १६ ऑगस्ट १९८२ रोजी त्याच वेळेस | स्व. भाऊसाहेब संतुजी थोरात ] आमदार होते. त्यांचे लक्ष वेधले होते. संगमनेर जिल्हा सुरु करावा. पण त्यांनी साफ दुर्लक्ष केले. जर त्यांनी लक्ष घातले असते तर लातूर बरोबर संगमनेर जिल्हा सुरु झाला असता. किती आनंद वाटला असता. असे निवेदन दिले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!