स्वातंत्रसैनिक सहकार महर्षी आदरनीय भाऊसाहेब थोरात (दादा) यांचा जन्म शताब्दी महोत्सव सोहळा विविध कार्यक्रमांनी साजरा…..

संगमनेर / लोकवेधlive न्यूज / भाऊसाहेब फड  (मुख्य विशेष प्रतिनिधी)

स्वातंत्र सैनिक सरकार महषीं आदरनीय भाऊसाहेब संतुजी थोरात (दादा) यांचा जन्म शताब्दी महोत्सव सोहळा साजरा करण्यात आला
७ जानेवारी दुपारी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले व ८ जानेवारीला संध्याकाळी विविध कलागुणांचा मुला मुलींचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ९जानेवारीला खेळ मांडीला हा महिलांसाठी आदेश बांदेकर यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला व १२ जानेवारीला जन्मदिवस दिनी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले व विविध कार्यक्रम साजर करण्यात आले
तसेच संगमनेर तालुकासह संपुर्ण अहमदनगर जिल्ह्यात हा सोहळा साजरा करण्यात आला
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात हे आमदार झाले होते तसेच त्यांनी साखर कारखाना,दुध संघ, विविध शिक्षण संस्था विविध रस्ते विविध धरणे व सहकार,कृषी, राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक यासह अनेक श्रेत्रामध्ये आपले भरीव कार्य केले आहे
त्यांना राष्ट्रीय,राज्यस्तरीय विविध प्रकारच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे
त्यांच्याच पाऊलावर पाऊल टाकुन मा श्री बाळासाहेब थोरात (माजी महसूलमंत्री मंत्री महाराष्ट्र राज्य) मा श्री सुधीर तांबे (माजी आमदार) सौ.दुर्गाताई तांबे, आमदार सत्यजित तांबे हे कार्य करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!