*सेंटेनरी स्कूल मध्ये तिळगुळ वाटप कार्यक्रम*.

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

नवीन वर्षाची सुरुवात मकर संक्रांत या सणाने होते. या सणाची छोट्या बालगोपाळांपासून वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच आकर्षण असते. याच उद्देशाने शहरातील गोखले एज्युकेशन सोसायटीचे सेंटेनरी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये मकर संक्रांत निमित्त तिळगुळ वाटप करण्यात आले. याप्रसंगी छोटे बालगोपाल रंगबिरंगी कपडे परिधान करून स्कूलमध्ये आनंद साजरा करत होते. या सणा निमित्त छोट्या बालगोपालांनी आपल्या पालकांच्या मदतीने विविध रंगाचे पतंग बनवून आणले होते व ते एकमेकांना दाखवताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांसह पालक उपस्थित होते. याप्रसंगी स्कूल मधील शिक्षिका मोनाली कोष्टी, मीना वाकचौरे, स्वप्नाली दळवी(ताई) यांनी उपस्थित सर्व महिलांना हळदी कुंकू लावून तिळगुळ वाटून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ललिता शिंदे, अभंग ताई, सचिन बिहानी, अमित मंडलिक, मोहसीन रंगरेज, सुनिता भालारे, कोमल नेहे, पूनम भडांगे, ज्योती सूर्यवंशी, मंगल नेहे, मनीषा वाणी, पूजा मुर्तडक, सुष्मिता मुर्तडक, गोकुळ गुंजाळ आदी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्कूलमध्ये या उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल पेटिट विद्यालयाचे प्राचार्य सी. एन. निकम, अधीक्षक तथा पर्यवेक्षिका डॉ. अस्मिता देशपांडे, इन्चार्ज प्रा. गुलाब गायकवाड यांनी सेंटनरी स्कूलच्या शिक्षिकांचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!