दुधाला  अनुदान देतांना एअरटॅगींगची अट काढुन टाकण्यात यावी. जन संघर्ष संघटनेची मागणी 
संगमनेर / लोकवेध live न्यूज 
३.५/८.५दुधाला शासनाने ठरवुन दिलेला ३४ रुपये भाव देण्यात यावा, ५ रुपये अनुदान तिन महिन्यांसाठी देण्यात यावे तसेच अनुदान देतांना एअरटॅगींगची अट काढुन टाकण्यात यावी. असे निवेदन जनसंघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे साहेब, संगमनेर यांना देण्यात आले
यावेळी जन संघर्ष संघटनेचे अध्यक्ष संदीप दराडे जन संघर्ष संघटनेचे संघटक डॉक्टर मोहन पवार, रोहिदास सोनवणे, राहूल थोरात.अजिंक्य कर्पे आर्यन  गायकवाड
आकाश मोरे,अभय पाटील,निखिल पवार,अक्षय कोळगे,विकास शिंदे आधी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते
 दि. ०४/०१/२०२४ रोजी शासन आदेश पारीत झाला. त्यात ३.५/८.५ दुधाला २७ रुपये भाव व अनुदान फक्त ३० दिवसासाठी अशी घोषणा करण्यात आली. यामध्ये राज्यात लाखो गाईचे इअर टॅगींग करणे बाकी आहे. म्हणुन हे अनुदान सर्व दुध उत्पादकांना मिळणार नाही. यामुळे आपण दुध उत्पादकांची निराशा केलेली आहे.
खालील प्रमाणे आमच्या मागण्या मान्य करुन अंबलबजावणी लवकरात लवकर करावी हि विनंती.
१) ३.५/८.५ दुधाला ३४ रुपये भाव दयावा.
२) भेसळ बाबत कठोर कारवाई करुन शेतक-यांना न्याय दयावा.
३) अलुदानासाठी टॅगींग प्रक्रिया पूर्ण पणे फेल असल्याने हि अट न ठेवता सरसकट अनुदान ३ महिन्यासाठी दया.
४) पशुखादयांच्या किंमती ३०% कमी केल्या पाहिजे.
५) राज्यात पशुवैदयकीय खात्यात जवळपास ४०% जागा रिक्त आहेत. त्या भरण्यात याव्यात.
वरील प्रमाणे मागण्या मान्य न झाल्यास एक महिन्यानंतर तिव्र आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो शेतक-यांच्या उपस्थित करण्यात येईल.असे जनसंघर्ष संघटनेच्या निवेदनातं म्हटलं आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!