पोदार इंटरनॅशनल विद्यालय ओझर येथे ‘प्रजासत्ताक दिन’ उत्साहात साजरा
नाशिक / लोकवेध live न्यूज
उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला.. नतमस्तक मी त्या सर्वांचा, ज्यांनी भारत देश घडवला… भारत देश, आमुचा महान
स्फूर्ती देते आमचे संविधान..
२६ जानेवारी हा दिवस सर्वत्र प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून पोदार इंटरनॅशनल स्कूल ओझर येथे प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जसिंथा पारके, श्रावणी कमूजू, विशाल मेंढे, समन्वयक शिक्षिका यांच्या हस्ते दीप प्रज्वलन, प्रतिमा पूजन आणि ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यालयातील इयत्ता सहावी ते नववी च्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर परेडचे संचलन केले. विद्यालयातील इतर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी गीत गायन, नृत्य, नाटिका अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणाने सर्वांचे मन भारावून टाकले. विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जसिंथा पारके यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणांतून सर्व विद्यार्थ्यांना आपल्या नागरिकत्वाची जाणीव करून दिली.
कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाचे क्रीडा शिक्षक राकेश शर्मा यांनी केले. कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जसिंथा पारके यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघा कमानकर यांनी पार पाडले व आभार सुयोग गढरी यांनी व्यक्त केले.
