जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी येथे भारताचा ७५ वा गणतंत्र दिवस उत्साहात साजरा

अकोले / लोकवेध live न्यूज 

अकोले तालुक्याच्या देवठाण बीटातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी येथे भारताचा ७५ वा गणतंत्र दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सरपंच मा. श्री. दत्तात्रय गरुड यांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वज तिरंग्याचे ध्वजारोहण संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यवस्थापनचे डॉ. जनार्दन मोरे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कामगार पोलिस पाटील श्री. रामदास तिकांडे, मा. सरपंच श्री. रामहरी तिकांडे उपस्थित होते. यावेळी काढण्यात आलेल्या गणतंत्र दिवस अमृत महोत्सवी प्रभातफेरीत सर्व विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ सहभागी झाले. टाकळी शाळेतील विद्यार्थ्यांची भाषणे, देशभक्तीपर गीतगायन, वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. प्रस्तुत कार्यक्रमाचे औचित्य साधून अकोले तालुकास्तरीय विविध स्पर्धांमधून विशेष नैपुण्य संपादन केलेल्या टाकळी शाळेतील विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रके देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच यावेळी मुंबई पोलीस विभागात निवड झालेली टाकळी शाळेची माजी विद्यार्थीनी कु.संचिता वाघ हिच्या मातापित्यांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीनिवास पोतदार, प्रास्ताविक संजय देशमुख, तांत्रिक सहाय्य संजय शिंदे व आभार दत्तात्रय देवगिरे यांनी मानले. माध्यमिक विद्यालय टाकळी शिक्षक स्टाफ वाकचौरे सर, साबळे मॅडम व आहेर मॅडम यांनी देखील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्तम सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!