डिग्रस विद्यालयात 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

संगमनेर  / लोकवेध live न्यूज 

संगमनेर तालुक्यातील डिग्रस येथील सोमेश्वर सेवाभावी संस्थेच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात विद्यालयात शुक्रवार वार दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष संगमनेर येथील प्रसिद्ध व्यापारी श्री अमित शेठ कटारिया हे होते. प्रमुख अतिथी संगमनेर येथील प्रसिद्ध व्यापारी मयूर शेठ दर्डा हे होते. संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच विद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थ्यांची पालक व ग्रामस्थ हे उपस्थित होते.
याप्रसंगी सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महंत बुवाजी बाबा पुणेकर, संस्थेचे उपाध्यक्ष महंत उमाजी बाबा पुणेकर व संस्थेचे सचिव जानकीराम पुणेकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पांडुरंग बाचकर यांनी केले.विद्यालयाचे क्रीडा शिक्षक मच्छिंद्र खेमनर यांनी विद्यार्थ्यांकडून परेड संचलनाद्वारे झेंड्याला मानवंदना दिली आणि कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचा परिचय व अध्यक्ष पदांची सुचना मांडली.
शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये विद्यालयात विविध प्रकारच्या स्पर्धा व परिक्षांमध्ये यशस्वी झालेल्या यशवंत , गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व बक्षीस वितरण करण्यात आले. विज्ञान अध्यापक मंडळ संगमनेर आयोजित विज्ञान स्पर्धेत लहान गटात सहावीची मयुरी पुणेकर व मोठ्या गटात नववीचा आदित्य हाळनोर, यांनी शालेय पातळीवर प्रथम क्रमांक मिळविला तसेच गणित अध्यापक मंडळ संगमनेर आयोजित इयत्ता नववी गणित संबोध परीक्षा यामध्ये मच्छिंद्र पांडुरंग बिडगर या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला,संगमनेर तालुका कला संचालनाची रंगभरण स्पर्धेत शालेय स्तरावरील पाचवी व सहावी गटातील ॠतुजा बिडगर , सातवी व आठवी गटातील बिडगर साक्षी , नववी व दहावी गटातील वैष्णवी खंडू कोळपे आणि तालुकास्तरीय गटातून उत्तेजनार्थ पारितोषिक इयत्ता दहावीची हर्षदा किरण भालेराव यांनी मिळवले. संगमनेर तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये 17 वर्षे वयोगटातील कबड्डी स्पर्धेत मुलांनी द्वितीय क्रमांकचे बक्षीस मिळवले त्या संघाचा संघ नायक अभय वावरे व इतर खेळाडू यांचा सन्मान करण्यात आला. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात आदरणीय महंत श्री बुवाजी बाबा यांचा यांचा सन्मान करण्यात आला, याबद्दल विद्यालयातर्फे बाबांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक दिलीप दिवे यांनी केले.
विद्यालयातील इयत्ता 10 वीचे हर्षदा भालेराव व किसन मदने या विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिना निमित्त भाषने केली.
कार्यक्रमात शेवटी इयत्ता सहावी ते इयत्ता दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमसादर केला. गणेश वंदना, मराठी हिंदी गीतावरील नृत्य , विनोदी नाटिका, देशभक्तीपर गीते, लावणी नृत्य, शेतकरी नृत्य ,कोळी नृत्य , बाबीर देवाच्या गीतावर नृत्य अशा विविध कार्यक्रमांचा समावेश या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाची शिक्षक विजय शेंगाळ यांनी केले.
कार्यक्रम संपल्यानंतर डिग्रस गावचे युवा नेतृत्व श्री. सुरेश उदावंत ,श्री. कालीचरण पुरी ,श्री. पोपट राणूजी बिडगर , श्री. श्रीकांत नान्नार श्री. अशोक बिडगर, श्री. रवी पुणेकर व श्री.शब्बीर पठाण ,श्री.ज्ञानदेव पुणेकर,श्री.संजय बिडवे यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या नाष्टयाची व्यवस्था केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे शिक्षक ज्योती चिंधे, मनीषा आचपळे , श्रीपाद पांढरे , बारकू पुणेकर ,आविळे मावशी यांनी परिश्रम घेतले.
विद्यालयाचे शिक्षक महेंद्र पुणेकर यांनी सूत्रसंचालन केले व साहेबराव नेहे यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!