सात्रळ येथील रयतच्या दोन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय प्रज्ञा शोध परीक्षेसाठी निवड
निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज / अशोक गोसावी
रयत शिक्षण संस्थेचे नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालय सात्रळ ता.राहुरी जि.अनगर येथील कुलकर्णी ओमकार अभिजित आणि जोर्वेकर विराज श्रीकांत या दोन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय प्रज्ञा शोध परीक्षेसाठी निवड झाली असूनही हे विद्यार्थी जिल्हा प्रज्ञा शोध परीक्षेत प्रज्ञावंत ठरले आहे.
या विद्यार्थ्यांना विभागप्रमुख सच्चिदानंद झावरे, वर्गशिक्षक वैभव वसावे, प्रकाश कुलथे, विलास गभाले, शिवदास सातपुते, गिताजंली गोसावी, पल्लवी गावडे आदींनी मार्गदर्शन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे,सहाय्यक अधिकारी बाबासाहेब नाईकवाडी, प्रमोद तोरणे, ॲड विजयराव कडू पाटील, बबनराव कडू, संभाजीराव चोरमुंगे, भास्करराव फणसे, पत्रकार किशोर भांड,के.के.बोरा, युवानेते किरण कडू, पंकज कडू , विक्रांत कडू,गणेश कडू, प्राचार्य आर.बी बडे, पर्यवेक्षिका सुशिला थोरात, भाऊसाहेब पेटकर, सर्व स्कूल कमिटी सदस्य, ग्रामस्थ व पालक आणि शिक्षणप्रेमी यांनी अभिनंदन केले.
