कनोली विद्यालयात ७५ वा प्रजासत्ताक दिन 
उत्साहात संपन्न झाला
पिंपरणे / लोकवेध live न्यूज 

आज शुक्रवार दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी ७५वा प्रजासत्ताक दिन मा.श्री.भाऊसाहेब संतुजी थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कनोली या विद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष मा. सिताराम पाटील वर्पे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच या कार्यक्रमासाठी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी  वर्पे, संचालक नामदेव विठोबा वर्पे,  बंडोपंत वर्पे सदस्य ग्रामपंचायत कनोली,वर्पे मिनानाथ गोपीनाथ (संचालक स. म. भा. संतूजी थोरात सहकारी साखर कारखाना संगमनेर ) सोपान वर्पे (मा.चे.सोसायटी कनोली) ज्ञानदेव वर्पे रमेश मारुती पारखे पाराजी वरपे गौतम जगताप सागर वर्पे व विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम लेझीम पथकाच्या प्रात्यक्षिक आणि चिमुकल्या बालकांच्या सुमधुर आवाजात सुंदर भाषणे झाली मान्यवरांनी आपले विचार मांडले त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री थोरात सर यांनी केले तर प्रास्ताविक विद्यालयाचे प्रा. के.एम. वर्पे सर यांनी केले. आणि आभार व विद्यार्थ्यांच्या आनंदाचा क्षण गावकऱ्यांच्या सहकार्यातून चॉकलेट गोळ्या बिस्किट यांची वितरण करून कार्यक्रम संपन्न झाला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!