विद्यार्थ्यांमधील कौशल्य वृद्धीसाठी नवीन शैक्षणिक धोरण पोषक-माजी कुलगुरू डॉ.पंडित विद्यासागर
राजूर / लोकवेध live न्यूज
देशात मनुष्यबळाची गरज कशी आहे हे विचारात घेऊन शैक्षणिक धोरणात बदल अपेक्षित असतो, पारंपरिक शिक्षणाबरोबरच कृतिशील शिक्षणाची आज गरज आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांमधील कौशल्य वृद्धीसाठी नवीन शैक्षणिक धोरण पोषक ठरेल ” असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि भौतिक शास्त्राचे गाढे अभ्यासक, डॉ पंडीत विद्यासागर यांनी केले. ते ॲड.एम.एन.देशमुख महाविद्यालय राजूर येथील विज्ञान मंडळ उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी
सत्यनिकेतन संस्थेचे सचिव टी.एन.
कानवडे हे उपस्थित होते. आपल्या पुढील भाषणात माजी कुलगुरू डॉ.पंडित विद्यासागर म्हणाले की,” यापुढील काळात विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक व संशोधन वृत्ती निर्माण करण्यासाठी महाविद्यालयांमध्ये उपक्रम केंद्रे विकसित करुन विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकसित करावी लागतील. असे झाले तर अवकाश संशोधन क्षेत्रात जगात भारत एक क्रमांकावर
पोहचू शकेल .” असे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले. त्यांच्या हस्ते विज्ञान मंडळाचे उद्घाटन संपन्न झाले, तसेच चांद्रयान मोहीम या बाबत त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य प्रोफेसर डॉ.भाऊसाहेब देशमुख यांनी केले. व महाविद्यालयातील उपक्रमांसंबंधी चा आढावा मान्यवरांना करून दिला. याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित डॉ. विश्वास जपे (जागतिक बँक सल्लागार), माननीय जे. पी.कोठाडीया,(सेवानिवृत्त संचालक प्रीमियर कंपनी पुणे), प्राचार्य डॉ.मोहन वामन (डॉ. डी.वाय.पाटील कॉलेज,आकुर्डी), टी. एन.कानवडे (सचिव
सत्यनिकेतन संस्था ) या सर्व मान्यवरांचा महाविद्यालयाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
विज्ञान मंडळ विभाग प्रमुख प्रा. एस. डी. कडलग यांनी प्रमुख मान्यवरांचा परिचय करून दिला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. मोहन वामन , डॉ विश्वास जपे,टी. एन.कानवडे यांनीही आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमात डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठ, पुणे यांचे वतीने
आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त श्री. टी.एन.कानवडे सर व प्राचार्य प्रोफेसर डॉ.भाऊसाहेब देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.के.जे.काकडे यांनी केले तर सूत्रसंचलन प्रा. एस. वाय.हांडे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
