आश्वी  बुद्रुक येथील अवैधरित्या दारु विक्री करणार्‍या हॉटेलवर आश्वी पोलिसांचा छापा !

आश्वी / लोकवेध live न्यूज

संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदार संघातील आश्वी बु॥ येथील अवैधरित्या दारु विक्री करणार्‍या हॉटेलवर आश्वी पोलिसांनी छापा टाकून रॉयल चॅलेज व देशी दारुच्या सुमारे 6610 रुपये किंमतीच्या दारुच्या 6 व 79 अश्या 85 बाटल्या जप्त केल्या असून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून नव्यानं आलेल्या पोलिस निरिक्षकांची दमदार कामगिरीने परिसरात दबदबा निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे .

याबाबत माहिती अशी की, आश्वी पोलीस ठाण्यात नव्यानं आलेल्या पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांना गुप्त माहिती मिळाली की आश्वी बु ॥ येथील इरिकेशन बंगल्या जवळील एका हॉटेलात (हॉटेल जय मल्हार ) अवैध दारू विक्री चालू आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सोनवणे यांनी रविवार दि 28 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 7 वाजल्याच्या सुमारास अचानक छापा टाकला असता 6 हजार 610 रुपये किंमतीचा मुद्देमालासह सोमनाथ बबन गायकवाड ( रा. प्रतापपूर ता संगमनेर ) यांला अटक करत गुन्हा दाखल केला

याबाबत हवालदार आनंद रतन वाघ यांनी आश्वी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यावरुन गुन्हा रजिस्टर नंबर 22/ 2024 मु. प्रो अ‍ॅक्ट 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या अवैध दारु विक्रीच्या बाटल्यांमध्ये 1080 रुपये किंमतीच्या रॉयल चॅलेज कंपनीच्या 180 मिलीच्या प्रत्येकी एकशे ऐंशी रुपये किंमतीच्या 6 सिलबंद बाटल्या , 5530 रुपये किंमतीच्या प्रत्येकी सत्तर रुपये किंमतीच्या देशीच्या 79 सिलबंद बाटल्या अशा एकूण 6 हजार 610 रुपये किमतीच्या 85 बाटल्या जप्त करण्यात आल्या असून पो नि संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पो कॉ पी डी साठे हे तपास करत आहे .

नव्याने नियुक्त झालेल्या पोलिस निरिक्षक संजय सोनवणे यांनी आपली दमदार एन्ट्री करत अवैदय धंन्देवर मोर्चा वळवत धडाधड कारवाईचा बडगा उभारल्याने अवैदय धंन्दा करणाऱ्यांची झोप उडाल्याचे दिसून येत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!