राज्य परिवहन बस थांबा धाब्यावर ३० रुपयात , चहा नाश्ता ची पुणे नाशिक महामार्ग धाब्यावर अंमलबजवानी सुरु ….

  वरिष्ठ निरीक्षक शेख मॅडम, अण्णासाहेब काळे, ज्ञानेश्वर गायकर,अजित मणियार यांच्या लढ्याला यश 

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

पुणे नाशिक महामार्ग धाब्यावर राज्य परिवहन बसेस ज्या ठिकाणी थांबत होत्या त्या ठिकाणी हॉटेल चालक , राज्य परिवहन महा मंडळ यांच्या सूचनांचे खाद्य पदार्थ बाबत योग्य नियम पाळत नव्हते , या बाबत संगमनेर येथील वरिष्ठ निरीक्षक शेख मॅडम,अण्णा काळे, ज्ञानेश्वर गायकर , अजित मणियार आदिनी तक्रार दाखल केली होती . हॉटेल फाउंटन वर तात्काळ कारवाईची मागणी केली होती . मुख्यमंत्री , मुख्य सर व्यवस्थापक , पुणे विभागीय निरीक्षक यांच्या कडे तक्रार दाखल केली होती . ह्या बाबत चे पुरावे ही दाखल केले होते . ह्या सर्व बाबींचा तपास राज्य परिवहन चे अधिकारी श्री आगाव यांनी करुन सर्व धाबा चालकांना नोटीस बजावली होती . धाबा चालकांची अरेरावी ह्या नोटीस द्वारे संपुष्ठात आली असून , सर्व एसटी प्रवाशांना आता तीस रुपयात चहा, नाश्ता मिळेल , या अगोदर हे धाबा चालक सत्तर रुपये वसूल करत होते . सर्व ठिकाणी ठळक सूचना देण्याची मागणी श्री गायकर यांनी महा मंडळाचे अधिकारी कदम यांच्या कडे केली . त्यांनी ती लगेच आमलात आणण्याची सूचना सर्व धाबा मालक यांना केली . प्रवासी संघटना जागृत असेल तर काय होऊ शकते याचे उत्तम उदाहरण हे असल्याचे गायकर यांनी म्हटले आहे .सर्व एसटी अधिकारी यांना धन्यवाद देण्यात आले असून , संगमनेर ला सर्व एसटी अधिकारी यांना बोलावून विशेष सत्कार करणार असल्याचे श्री अण्णा काळे यांनी सांगितले .. प्रवाशांनी ह्या सवलतीचा लाभ घ्यावा असे अहवान संगमनेर एसटी प्रवासी महासंघा ने केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!