अमृतवाहिनी हॉस्पिटलमध्ये अद्यावत व अत्याधुनिक आरोग्य सुविधा
एसएमबीटी आरोग्य सेवेचा ब्रँडनेम – मा.आ. डॉ सुधीर तांबे
संगमनेर / लोकवेध live न्यूज
घुलेवाडी येथील अमृतवाहिनी रूलर हॉस्पिटल येथे एसएमबीटी क्लिनिक च्या बाहय रुग्ण विभागाचा शुभारंभ झाला. यावेळी मा. आ. डॉ. सुधीर तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, जि.प.सदस्य रामहरी कातोरे, मुख्याधिकारी श्रीराम कु-हे ,प्राचार्य डॉ.अशोक पाटील, डॉ. बाळकृष्ण देशपांडे, डॉ सचिन गोडसे ,डॉ नितीन बस्ते ,डॉ राज म्हस्के ,विष्णुपंत रहाटळ, सुरज कडलग ,डॉ सुरज तूपसाखरे, डॉ. सचिन बोरसे महेश वाव्हळ ,सिताराम दिघे, धनंजय भुसाळ, रमेश दिघे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मा.आ.डॉ तांबे म्हणाले की, तालुक्यातील गोरगरीब आदिवासी व सर्वसामान्य माणसांच्या आरोग्य सेवेकरता थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टच्या माध्यमातून अमृतवाहिनी रूलर हॉस्पिटल सुरू केले. काँग्रेस नेते आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एसएमबीटी ही संस्था आता देशातील आरोग्यसेवेचा ब्रँड नेम ठरली आहे. दररोज हजारो शस्त्रक्रिया तेथे होत असून संगमनेर तालुक्यातील नागरिकांना सोयीचे व्हावे म्हणून अमृतवाहिनी रूलर हॉस्पिटल या ठिकाणी अद्यावत सुविधा देताना बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे .यामध्ये एसएमबीटी मधील तज्ञ डॉ. दररोज भेट देणार असून नागरिकांची योग्य तपासणी करणार आहेत. यामुळे संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी सोय होणार असल्याचे ते म्हणाले.
तर कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, प्रत्येक माणूस आरोग्याकडे दुर्लक्ष करत असून त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवतात. ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्या याकरता एसएमबीटीच्या माध्यमातून अत्यंत चांगले काम होत असून संगमनेर तालुक्यात नव्याने सुरू झालेल्या या बाह्यरुग्ण विभागामुळे गोरगरीब, शेतकरी, महिला यांची मोठी सोय होणार आहे. येथे काही ऑपरेशन सह विविध शस्त्रक्रिया तसेच तपासण्या केल्या जाणार असून मोठ्या शस्त्रक्रिया तातडीने एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये केल्या जाणार आहेत.या उपक्रमाचा जास्तीत जास्त महिला व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.
या बाह्यरुग्ण विभागामध्ये दररोज हृदयविकार शस्त्रक्रिया, कर्करोग ,मूत्रविकार ,मेंदू व मणके विकार ,सांधेरोपण क्रिया, प्लास्टिक सर्जरी, जन्मजात आजार ,अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, डीआरटीडी , ईपी स्टडी ,आदींसह सोनोग्राफी, रक्त, लघवी, तपासणी अशा विविध तपासण्याही केल्या जाणार आहेत.
यावेळी एसएमबीटी मधील विविध डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांसह विविध कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ गौरव वर्मा दर मंगळवार व शुक्रवारी येणार
महिन्याचा पहिल्या व तिसऱ्या बुधवारी कर्करोग तपासणी केली जाणार आहे. तर दर मंगळवार व शुक्रवारी प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. गौरव वर्मा हे हृदयरोग विकाराची तपासणी करणार आहेत. तसेच दर शुक्रवारी मेंदू व मनके विकार यांच्या हे तपासण्या होणार असून महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी मूत्ररोग विकार तपासणी होणार आहे. या क्षेत्रातील तज्ञ व नामवंत डॉ. तपासणीसाठी उपस्थित राहणार असून रुग्णांवर पुढील उपचार केले जाणार आहेत.
