
महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर असलेल्या सह्याद्री ह्या पर्वताच्या डोंगररांगामधील “अकोले” तालुक्यातील कळसुबाईच्या कुशीत उगम पावणाऱ्या अमृतवाहिनी”प्रवरा”
नदीच्या तीरावर संगमनेर तालुक्याच्या पूर्वेला जोर्वे” हे गाव आहे. या गावाला मोठी ऐतिहासिक, आध्यात्मिक परंपरा आहे.श्री क्षेत्र दत्त महाराजांचे पुरातन मंदिर प्रवरा नदीच्या काठावर आहे. जोर्वे संस्कृती म्हणून दिल्लीच्या पुरातत्वे विभागाच्या म्युझियममध्ये (संग्रहालयात) “जोर्वे” गावाला विशेष स्थान आहे.
महाराष्ट्राच्या ऐतिहासिक,सांस्कृतिक,आध्यात्मि
माझे वडील तीर्थरूप भाऊसाहेब थोरात हे वयाच्या 18 व्या वर्षापासून महात्मा गांधींच्या “चले जोर्वेच्या” 9 ऑगस्ट 1942 च्या चळवळीनंतर स्वातंत्र्याच्या लढयात सामील झाले. पुढे वयाच्या 86वर्षांचे होईपर्यंत सहकाराची उभारणी, शेतकर्यांच्या अनेक महत्त्वाच्या मागण्यांसाठी आंदोलने,लढे,चळवळीत स्वत:च नेतृत्व केले. सामाजिक प्रश्नांची सोडवणूक यामध्ये 68 वर्षे न थकता, न थांबता काम करत राहिले. त्यांनी गावच्या सोसायटीचे चेअरमनपदा पासून तर आमदार, अगदी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या चेअरमनपदापर्यंत उत्तमपणे काम सांभाळले. महाराष्ट्रात मोठा नावलौकिक मिळवला. सहकारी संस्था अतिशय काटकसरीने, व्यापारी ,व्यवहारी वृत्तीने जपल्या.सहकारवाढवला.दादासुरुवा
उत्तम नेतृत्व घडते ते एका दिवसात नाही, तर त्याला परंपरा असते पूर्वजांची. अशी समृद्ध परंपरा भाऊंनामिळाली. आमचे वडील हे कडक स्वभावाचे होते. वडिलांच्या सहकाराची उभारणी व इतर व्यापांमुळे शेती आई बघत असे. दादांना वेळ मिळेल तेव्हा ते स्वत: शेतीत काम करत.सर्व कुटुंबाला ही सवय असल्याने भाऊही शेतीच्या कोणत्याही कामात मागे नाही. त्यांना शेतीची सर्व कामे, ट्रॅक्टरने नांगरणी, पेरणी, जनावरांचे संगोपन इत्यादी सर्व कामे येतात.
आजोबांकडे स्वामी विवेकानंदांची पुस्तके व अनेक आध्यात्मिकग्रंथ होते. त्यांना वाचनाची खूप आवड होती. वडिलांनाही वाचण्याची आवड होती. त्यांच्याकडे जगातील अनेक क्रांतिकारकांची पुस्तके, चरित्रे होती. वस्तीवर, ‘बनगरवाडी’,‘श्यामची आई’ पुस्तकांचे संध्याकाळी सामुदायिक वाचन होत असे. दादांना स्वातंत्र्य चळवळीत डॉ.अण्णासाहेब शिंदे, अॅड. रावसाहेब शिंदे, अॅड.पी.बी.कडू पाटील, धर्माजी पोखरकर इत्यादी सहकार्यांबरोबर नाशिकच्या तुरुंगातील सहवासात सामुदायिक वाचनाची सवय लागली व विचार समृद्ध होऊन वाचनाची आवड वाढली. भाऊंनाही वाचनाची आवड आहे. वेळ मिळेल तसे ते वाचन करतात. आता त्यांच्याकडे पुस्तकांचा मोठा संग्रह आहे. सर्वधर्मसमभावाचे पिढीजात संस्कार भाऊंवर झाल्याने ते जात-पात मानत नाहीत. चुकीच्या रुढी,परंपरा, अंधश्रद्धा ते पाळत नाहीत.
माध्यमिक शिक्षणानंतर भाऊंनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये व नंतर लॉ कॉलेजमध्ये वसतिगृहात राहून शिक्षण घेतले. पुण्यात त्यांनी “पाणी पंचायत” मध्ये पाणी प्रश्नांवर, परीक्षा फी माफी साठी आंदोलन केले. कारण 1972चा दुष्काळ खूप कठीण होता. ते स्वत: वकील झाले, व 1980साली विडी कामगारांच्या प्रश्नावर आंदोलनाचे नेतृत्व केले. या आंदोलनात त्यांना 9दिवसांचा कारावास झाला. मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीत त्यांनी भाग घेतला. हे काम करता करता सहकाराची सुरुवात जोर्वे दूध संस्थेची स्थापना करून केली.1985साली जनतेच्या प्रेमामुळे ते”आमदार”म्हणून निवडून आले. सर्वात कमी वयाचा ” आमदार” म्हणून विधानसभेत प्रतिनिधीत्व करण्याचीसंधी त्यांना मिळाली.
भाऊ कुटुंबवत्सल आहेत. आत्यांपासून तर सर्व बहिणी मुलींवर त्यांचे लक्ष असते. प्रत्येकीशी फोनवर बोलून चौकशी करतात. रक्षाबंधन, भाऊबीजेला सर्वांना भेटतात. त्या त्या सणाचा आनंद साजरा करतात. सौ.कांचन वहिनींचे माहेर इस्लामपूर तालुक्यातील “तांबवे” आहे. त्यांच्यात कोल्हापुरी वसांगलीकडच्या रीतीरिवाजाच्या स्वयंपाक पद्धती आहेत. त्याही भाऊंच्या बरोबरीने कुटुंब,नातेवाईक, कार्यकर्त्यांकडे लक्ष देतात. भाऊने आम्हाला कधीच मोठे भाऊ म्हणून रुबाब दाखवला नाही. आम्हाला शाळेत, कॉलेजमध्ये असताना खूप सांभाळले. होस्टेलवर सोडणे आणि मधूनमधून भेटायला येणे, चौकशी करणे, तब्येत बरी नसल्यास दवाखान्यात नेणे ही सर्व कामे ते आपुलकीने, मायने करत. आम्हा भावंडांची कधीच भांडणे व मारामार्या झाल्या नाहीत. नंतर आमच्या लग्नाचे नियोजन करणे, आमच्या वस्तीवरील सर्व बहिणींना सासरी सोडणे, माहेरी आणणे, जीपमधून सर्वांना डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलला सोडणे, आम्हाला मनपसंत साड्या घेणे, सर्वांना शेतात डोंगरावर फिरायला घेऊन जाणे ही सर्व कामे ते लहान वयापासून हौसेने, आनंदाने करतात. माझा मोठा मुलगा सत्यजितच्या जन्माच्या दिवशी अतिवृष्टी झाली, रस्त्यावर खूप चिखल झाला. बैलगाडी चालवीत भाऊंनी आम्हाला हॉस्पिटलला पोहोचवले. माझा छोटा मुलगा डॉ. हर्षल लहानपणी रात्री खूप रडायचा. पहाटे भाऊ येऊन म्हणायचे, ” बाई व तू झोप मी झोका देतो”.भाच्यांचे, पुतण्यांचे, मुलींचे लाड करणे, खांद्यावर घेऊन फिरणे, डोंगरावर करवंदे खायला नेणे, धरणावर फिरायलानेणेयांसाठी सर्वांना वेळ देतात. भाऊंचा स्वभाव कुटुंबवत्सल असल्याने भावंडांमध्ये,भाच्यांमध्ये,नाते
भाऊंमध्ये साधेपणा,काटकसर, दूरदृष्टी असल्याने ते राजकारणात,समाजकारणात एवढी प्रगती करू शकले. ते मितभाषी आहेत. कोणत्याच गोष्टींचा अतिरेक त्यांच्यात नाही. जेवणही मोजून-मापून व साधेच करतात. जेवण आवडले म्हणून अर्धी पोळी सुद्धा जास्त खात नाही. आनंदाने हुरळून जाणे व दु:खाने खचून जाणे त्यांच्या स्वभावातच नाही. ते “स्थितप्रज्ञ”स्वभावाचे आहेत. राजकारणात, कुटुंबातही ओरडणे हे त्यांच्या स्वभावात नाही. मी सर्वात लहान असूनही त्यांनी आजपर्यंत मला त्यांनी शब्दानेही दुखावले नाही. राजकारणात वरवर गोड बोलणे, गळ्यात पडणे व खालून पाय घालून पाडणे हे त्यांनी कधीच केले नाही. त्यांचा स्वभाव म्हणजे आपले काम व्यवस्थित करत राहणे. ते कधीही आळसात, आरामात दिसणार नाहीत. सतत दिल्ली-मुंबई महाराष्ट्रभर, मतदारसंघात दौरे चालू असतात. सौ. कांचन वहिनी म्हणतात, ” तुम्हा बहीण – भावाला बाईंनी कोणते अमृत पाजले? तुम्ही दमतच कसे नाही? ” जे बोलायचे असेल ते छोट्या वाक्यातच, पुढच्याला समजेल असे बोलतात.
त्यांच्या अशा व्यक्तिमत्त्वामुळे त्यांना सोनियाजी गांधी यांनी कॉंग्रेसपक्षाच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीवर कायमस्वरूपी सदस्य करून घेतले आहे.1972च्या दुष्काळानंतर ज्यांनी भारतात
डॉ.स्वामिनाथन यांच्या मार्गदर्शनाखाली हरितक्रांती श्वेतक्रांती केली, ते आमचे मामा डॉ. अण्णासाहेब शिंदे हे पंतप्रधान पंडित नेहरू, लाल बहादुर शास्री, इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री होते. त्यांचे भाऊंवर विशेष प्रेम होते. त्यामुळे भाऊ नेहमी सुट्टीत दिल्लीला जात. मामांमुळे इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण,वसंतदादा पाटील, राजीव गांधी यांसारख्या खूप मोठ्या माणसांचा सहवास भाऊंना मिळाला. मामांबरोबर त्यांनी परदेश दौरेही केले. त्यातूनच भाऊंचे व्यक्तिमत्त्व फुलत गेले. भाऊ शांत व संयमी वृत्तीचे आहेत. धरसोड वृत्ती त्यांच्यात नाही. पद असो वा नसो शांतपणे काम करणारा,साधेपणा जपणारा,माणसांना आपुलकीने जीव लावणारा, कार्यकर्त्यांना नावानिशी हाक मारणारा नेता म्हणून भाऊंना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांच्या अशा व्यक्तिमत्त्वामुळे काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचे ते आवडते आहेत. अशा अभ्यासू,शांत व्यक्तिमत्त्वामुळे त्यांना 1999साली राज्यमंत्रिपद मिळाले. तर 2022पर्यंत महसूल मंत्रिपद व अनेक महत्त्वाची खाती मिळाली. प्रत्येक वेळी खाते सांभाळताना त्यांच्यातील अनेक गुणवैशिष्ट्यांचे पैलू आपल्याला दिसले. एवढ्या मोठ्या राज्याच्या मंत्रिपदाचा,मतदारसंघाचा व्याप सांभाळत असताना त्यांनी सहकाराचे व्यवस्थापन देखील उत्तम ठेवले आहे.
सध्या संपूर्ण भारतात दिशादर्शक असलेला संगमनेरचा सहकार त्यांच्या बारीक नजर,दूरदृष्टीतून,उत्तम व्यवस्थापनातून दिमाखाने उभा आहे.महाराष्ट्रभरच्या दौर्यात ते कधीच बोलण्याचा अतिरेक करत नाहीत. ज्या लोकांच्या सहकारी संस्था मोडल्या, मोडकळीस आल्या तेच महाराष्ट्रभर भाषणे करीत फिरतात की सहकार टिकला पाहिजे.पण आमचे भाऊ येथे असणारा दिशादर्शक सहकार असूनही अहंकाराने कधीच बोलत नाहीत. आज संगमनेरचा सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना हा 11 लाख मेट्रीक टनापर्यंत गाळपक्षमता असलेला अग्रगण्य कारखाना आहे. साखर उतारा 11.80 म्हणजे महाराष्ट्रात वरच्या क्रमांकावर आहे. ‘राजहंस’ नावाची साखर उत्पादन होत. तांत्रिक कार्यक्षमता, ऊर्जा बचतीची अनेक बक्षिसे कारखान्यानेमिळवलेली आहेत. उसाच्या मळीपासून डिस्टलरी प्लॅन्ट चालू आहे. नैतिकतेची जाणीव ठेवून या कारखान्यात देशी विदेशी दारूची निर्मिती न करता फक्त उच्च दर्जाचे “इंडस्ट्रियल अल्कोहोल” बनवले जाते.महाराष्ट्रात ऊस उत्पादकांना सर्वाधिकभाव देणारा, कर्मचार्यांचे पगार,बोनस वेळेवर देणारा कारखाना म्हणून ओळखला जातो, याचे सर्व श्रेय भाऊंनाच आहे.आज महाराष्ट्रातील बहुसंख्य शेतकी संघ,मार्केट कमिट्या बंद पडलेल्या आहेत. संगमनेरचा शेतकी संघ, मार्केट कमिटी बघण्यासाठी महाराष्ट्रातून कार्यकर्ते येतात. संगमनेर तालुका दूध संघ महाराष्ट्रातील एक नंबरचा तालुका पातळीवरच्या दूध संघ आहे. रोजचे दूध संकलन 4 लाख लीटरपर्यंत आहे. राजहंस नावाने संपूर्ण महाराष्ट्रात व राज्याबाहेर गुजरात, कर्नाटकमध्ये 2,45,000लीटरचे दूध पाऊच जातात. दुधाचे विविध पदार्थ दूध, दही श्रीखंड,ताक, लस्सी,पेढे,गुलाबजाम,चीज,पनीर,
भाऊंच्या या चाळीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत “निळवंडे धरण”पूर्ण करून उजवा कालवा व डावा कालव्याला पाणी आले आहे. हा त्यांच्या व शेतकर्यांच्या जीवनातील अत्यंत आनंदाचा क्षण आहे. सहकाराबरोबरच गावोगावी शेततळी, बंधारे, सभामंडप, रस्ते,तलाठी कार्यालय, अहमदनगरचे आधुनिक जिल्हाधिकारी कार्यालय उभे केले आहे. संगमनेर शहराकडे विशेष लक्ष देऊन अनेक वर्षापासून पाण्यासाठी त्रस्त असलेल्या नागरिकांना थेट निळवंडे धरणातून ग्रॅव्हिटीने पाणी आणून मुबलक स्वच्छ व शुद्ध पाणी दिले आहे. त्यांच्यासह हा शहरवासीयांच्या जीवनातील अत्यंत आनंदाचा क्षण होता. अशक्य वाटणारी गोष्ट त्यांनी प्रत्यक्षात करून दाखवली आहे.शहराची नवीन पुनर्रचना करताना त्यांनी शहरातून जाणार्या रस्त्यांचे रुंदीकरण, विद्युतीकरण व सुशोभीकरण केले. बसस्थानक तर खूपच आधुनिक बांधले आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. शहरातून वाहणार्या पाच नद्यांचा तीर अधिक सुंदर करण्याचे काम चालू झालेले आहे. त्यांना शहर, गाव, सौंदर्याची दृष्टी आहे. आर्किटेक्चरची, आधुनिकतेची त्यांना आवड असल्याने शहरात प्रांत ऑफिस, तहसील कार्यालय,पंचायत समिती इमारत,नगर परिषद इमारत,कवी अनंत फंदी नाट्यगृह, न्यायालय इमारत व इतर सर्व इमारती देखण्या व सुंदर केल्या आहेत. त्यातून शहर खूप देखणे व सुंदर दिसू लागले आहेत. शहरातील इतर प्रमुख रस्त्यांसाठी निधी दिल्याने सर्व मुख्य रस्ते चांगले झाले आहेत. त्यांच्या व्यग्र राजकीय धावपळीत ते कधीही थकलेले दिसत नाहीत. सुखदु:खाच्या ठिकाणी आवर्जून भेटी देतात. मंत्रिपदाच्या काळात उदाहरणार्थ कृषी, शिक्षण, पाटबंधारे, महसूलची जबाबदारी असेल ती त्यांनी नवनवीन कल्पना राबवून पूर्ण केली. त्यांच्या कामांना गती, पारदर्शकता असते. काँग्रेस पक्षाचे प्रामाणिकपणे व एकनिष्ठपणे काम करत असल्याने त्याची दखल पक्षाने घेतली व त्यांना महत्त्वाची जबाबदारी दिली. इतर राज्यांच्या निवडणुकीतही जबाबदारी दिली. पक्षाच्या वाढीसाठी ते सतत प्रयत्नशील असतात. काँग्रेस कार्यकर्त्यांना सदस्य नोंदणीचे प्रशिक्षण देण्यासाठी शिबिरे घेतात. भाऊंचे वक्तृत्व खूप चांगले आहे. ते कधीही अपशब्द, वादग्रस्त विधान करत नाहीत. त्यांचे बोलणे सौम्य व शांत असते.
अशाही कामाच्या व्यापात त्यांच्या कन्या शरयू, सविता, जया यांच्याशी त्यांचा रोज फोनवर संवाद असतो त्यांना शिक्षणात व कामात टाळाटाळ आवडत नाही. मुलगा राजवर्धन हा अमेरिकेत”आर्किटेक्चर” मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. सौ कांचन वहिनी नातं, गोतं, कुटुंब व्यवस्थित सांभाळत असल्याने भाऊंना काळजी नाही. पूर्वीपासूनच निसर्ग,झाडे, पक्षी यांची खूप त्यांना आवड आहे. दादांनी सुरू केलेले “दंडकारण्य अभियान” पुढे नेत 28कोटींच्या बियांचे रोपण,80लाख रोपांची लागवड त्यांनी केली आहे. वास्तुशांती, वाढदिवसाला ते झाडांची रोपे भेट देत असतात. निसर्गात त्यांचे मन खूप रमते. वेगवेगळी फळे ,बोरे ,चिंच, कौठ ,करवंदे ,आंबा ,जांभळे त्यांना खूप आवडतात. त्यांनी आमचे आजोबा संतुजी थोरात यांची आयुष्याच्या अखेरची काही महिने खूप सेवा केली. तीर्थरूप दादा व बाई यांची खूप काळजी घेतली. ते कर्तव्य पार पाडतात न बोलता व शांतपणे.मी दादांना म्हणायचे, “तुम्ही खूप कष्टाने हा सहकार उभा केला. आम्ही किती भाग्यवान तुमच्यामुळे आम्हाला नेतृत्व करण्याची संधी मिळाली. भाऊ किती भाग्यवान त्याला महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली”. तर दादा म्हणायचे, ” बाळासाहेब स्वत: ” कर्तृत्ववान ” मुलगा आहे. म्हणून महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची त्याला संधी मिळाली आहे”.अशा आमच्या लाडक्या “बंधू” साठी आम्ही बहिणी एवढेच म्हणतो की,
“माहेरचा देवा, नाही तुला विसरत!!
पाठीच्याबंधुजीचा, वेल जाऊदे पसरत” !!1!!”
“आमच्या आयुष्याची देवा, आखूड घाल दोरी,
हौशीबांधवाला माझ्या, घाल शंभरी पुरी “!!2!!
सौ. दुर्गा सुधीर तांबे,
मा.नगराध्यक्षा संगमनेर नगरपरिषद संगमनेर,
अध्यक्ष जयहिंद महिला मंच संगमनेर,
जि.अ.नगर मो.नं – 9822553254
