समतेचा महाराष्ट्र धर्म वाढवण्याचा शिवपुत्र संभाजी महानाट्यातून मूलमंत्र

तिसऱ्या दिवशी 60 हजार नागरिकांची उपस्थिती

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार डॉ.अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेल्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला असून सलग तिसऱ्या दिवशी साठ हजारांची उपस्थिती होती .या सह लाखो नागरिकांनी समतेचा महाराष्ट्र धर्म वाढवण्याचा मूलमंत्र घेतला आहे.

जाणता राजा मैदानावर आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या तिसऱ्या दिवशी सुमारे 60000 नागरिकांची उपस्थिती होती यावेळी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात मा. आमदार डॉ सुधीर तांबे, नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, उद्योगपती मनीष मालपाणी, गिरीश मालपाणी ,कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, रणजीत सिंह देशमुख आदींसह विविध मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास सांगणारे धगधगते महानाट्य शिवपुत्र संभाजी संगमनेर मध्ये होत असून दररोज पन्नास हजारांच्या पुढची उपस्थिती या महानाट्यात लाभत आहे. आलेल्या सर्व नागरिकांची  चांगली बैठक व्यवस्था ,पार्किंग व्यवस्था, आकर्षक सजावट विद्युत रोषणाई आणि डोळे दिपवणारी उपस्थिती यामुळे हा सोहळा संस्मरणीय ठरत आहे.

स्वराज्य हे महाराष्ट्रातील अठरापगड समाजाचे आहे, समतेचा, एकीचा, बंधू भावाचा हा विचार स्वराज्याचा आणि महाराष्ट्राचा आहे. त्या काळातही अनाजी रुपी लोकांनी तेढ निर्माण केली. तसेच विद्यमान काळातही अशा काही शक्ती समाजा- समाजात तेढ निर्माण करत आहेत.म्हणून अशा शक्तींना वेळीच रोखून समतेचा महाराष्ट्र धर्म वाढवण्याचा मूलमंत्र लाखो नागरिकांनी घेतला आहे.

शिवपुत्र संभाजी यांचे आश्वावरून नागरिकांमधून आगमन होताच जाणता राजा मैदानावर होणारा जल्लोष हा संस्मरणीय ठरत आहे. संभाजी महाराजांच्या भूमिकेतील डॉ अमोल कोल्हे यांचे संवाद आणि त्यांचा आवेश पूर्ण अभिनय पाहताना प्रत्येकाला प्रत्यक्ष संभाजी राजे दिसत आहे.

याचबरोबर सोयराबाई ची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री स्नेहलता वसईकरणे दिलेला योग्य न्याय आणि कटकारस्थान रचणारे अनाजी पंताची भूमिका करणारे महेश कोकाटे यांचा अभिनय वाखाण्याजोगा आहे.स्थानिक कलाकारांसह सुमारे अडीचशे कलाकारांच्या संचात साजरे होणारे हे महानाट्य प्रत्येकासाठी एक अनमोल ठेवा ठरत आहे.

यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे. सर्व धर्म समभावाचा आहे.आपल्याला हा विचार पुढे घ्यायचा आहे. संगमनेर तालुका हा विकासातून प्रगती करतो आहे. मोठ्या कष्टातून तालुक्यात आर्थिक संपन्नता निर्माण झाली आहे. निळवंडे धरण व डावा आणि उजवा कालवा पूर्ण केला आहे त्यातून तालुक्यात पाणी आल्याने स्वप्नपूर्ती झाली आहे. या चांगल्या कामांमध्ये व तालुक्याच्या विकासात काही लोक अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र एक तालुका एक परिवार आपला आहे. अडथळे निर्माण करणाऱ्या चा तालुक्यातील जनता वेळीच पाय बंद करेल असेही ते म्हणाले.

यावेळी कलर्स मराठी वरील पिरतीचा जीव तुझ्यात गुंतला या मालिकेतील कलाकारांनी ही या नाटकासाठी उपस्थिती दर्शवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!