जंगी मिरवणुकीने पिंपरी लौकी, अजमपुर, खळी,पानोडी, डिग्रस,अंभोरे येथे जलपूजन
कालव्यांमधून पाणी येणे ही स्वप्नपूर्ती – आमदार थोरात
संगमनेर / लोकवेध live न्यूज

पिंपरी लौकि, आजमपूर, खळी, पानोडी, डिग्रस, अंभोरे येथे पाणी पूजन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख, गणपतराव सांगळे राजेंद्र चकोर, नवनाथ महाराज आंधळे , विक्रम थोरात,शहाजी खेमनर, तुकाराम घुगे ,चंद्रकांत तांबे, वाघमारे गुरुजी ,अशोक वाणी, भास्कर खेमनर आदीं सह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, अनेक अडचणीवर मात करून निवडणे धरण पूर्ण झाले आहे. डाव्या व उजव्या कालव्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला सरकारकडून वेळोवेळी निधी मिळवला त्यामुळे उजव्या कालव्यावरील मोठ्या जलतूसेतुसह बोगदे पूर्ण करत आज पाणी शिवारात आले आहे. हा अत्यंत आनंदाचा व समाधानाचा क्षण आहे.
ज्या लोकांनी या कामांमध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला ते आता या कामाचा श्रेय घेऊ पाहत आहे मात्र जनतेला माहित आहे काम कोणी केले आणि अडथळे कोणी आणले. आपण आनंदाने आणि अभिमानाने आत्मविश्वासाने सांगतो की आपण काम केले या सर्व कामांमध्ये माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी मोठे सहकार्य लाभली आहे.
ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्यांचा त्यांचा कायम आवर्जून उल्लेख केला आहे त्यांच्याप्रती कृतज्ञता आहे मात्र ज्यांनी काहीच केले नाही. ते लोक प्रसिद्धीसाठी केविलवाना प्रयत्न करत आहेत.
संगमनेर तालुका विकास कामातून पुढे आहे ही विकासाची घोडदौड आपल्याला काय पुढे ठेवायचे आहे पाणी आल्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण झाला आहे पुढील अनेक पिढ्यांचे जीवन समृद्ध करणारे हे काम नियतीने आपल्या हातून करून घेतले असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी रणजीत सिंह देशमुख म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांनी काय गोरगरिबांचा विचार केला आहे शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणण्यासाठी विविध विकासाच्या योजना राबवल्या याचबरोबर सर्वात मोठे काम निळवंडे च्या रूपाने उभे केले आहे पुढील अनेक पिढ्या त्यांचे योगदान विसरणार नाही.
तर गणपतराव सांगळे म्हणाले की, महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे ज्याने काम केले त्याच्या पाठीशी काय उभे राहते पिढ्या पिढ्यांसाठी केलेल्या कामाबद्दल हा परिसर आमदार थोरात यांचा कायम ऋणी राहील असेही ते म्हणाले.
यावेळी महिलांनी ठिकठिकाणी औक्षण केले .तर जेसीबी मधून फुलांची उधळण करत आमदार बाळासाहेब थोरात यांचे जंगी स्वागत गावोगावी करण्यात आले.
