जायनावाडी जि.प.प्रा.शाळा व अंगणवाडी येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न.
पिंपळगाव नाकविंदा / लोकवेध live न्यूज
अकोले तालुक्यातील दुर्गम भागातील जायनावाडी येथे नुकताच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी यांच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून समशेरपूर मंडळ अधिकारी वर्पे पी.एस,अंगणवाडी पर्यवेक्षिका इंद्रा सोनवणे,आय.सी.डी.एस,अंजना पराड तालुका अध्यक्ष खिरविरे गट व द्रौपदा रावते,अंगनवाडी गटाच्या अध्यक्ष उपस्थित होत्या.
याप्रसंगी मंडळ अधिकारी वर्पे पी.एस.यांनी उपस्थित महिलांना संबोधित असताना सांगितले कि,विधवा महिलांसाठी मुलाचे वय 25 च्या आत असेल त्या महिलेला दीड हजार प्रति महिना लाभ महसूल विभागाकडून दिला जातो.सर्व महिलांनी तलाठी कार्यालयास भेट दिली पाहिजे.सर्व शासकीय योजनांचा लाभ घेतला पाहिजे व इंदिरा गांधी राष्ट्रीय कुटुंब सहाय्य योजना लाभ दिला जातो.तसेच लक्ष्मीमुक्ती योजना तलाठी ऑफिसला अर्ज देऊन पतीच्या नावे असेल तर त्या फॉर्म सोबत पत्नीचे पण नाव लागले पाहिजे.
शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती गवळी यांनी महिलांच्या समस्या त्यांनी स्वतःसाठी वेळ काढणे,महिला ही कुटुंबाची मुख्य आधार आहे, एक स्त्री शिकली तर ती दोन कुटुंबाची प्रगती करते.शासकीय सुविधा महिलां साठी विधवा आणि सधाव महिला मध्ये भेदभाव करू नये. स्त्री हि सक्षम झाली पायजे प्रत्येक स्त्री ही तालुक्यापर्यंत पोहचली पाहिजे.दरवर्षी असे कार्यक्रम आपल्या गावात झाले पाहिजे.आपल्या कुटुंबाची जबाबदारी ही सर्व आपल्यावरच असते असे बोलताना उपस्थित महिलांना सांगितले.
या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका व अंगणवाडी सेविका, त्यांचे सर्व कर्मचारी,मदतनीस,सर्व महिला बचत गट त्यांचे सदस्य व गावातील बहुसंख्य महिलां आपला अमूल्य वेळ देऊन उपस्थित होत्या.कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती गवळी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
