पोखरी हवेलीत किलबिलाट चिमुकल्यांचा….!

संगमनेर लोकवेध live न्यूज 

तालुक्यातील पोखरी हवेली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकताच “किलबिलाट चिमुकल्यांचा” हा विविध गुण दर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला. अनेकवीध गीतांच्या तालावर विद्यार्थ्यांची पावले थिरकताना दिसून आली. कोळी नृत्य,फ्युजन नृत्य, लावणी अशा हरतऱ्हेच्या नृत्यांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. उपस्थित प्रेक्षकांनीही विदयार्थ्यांच्या कलाविष्काराला भरभरून दाद दिली. शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यापक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी केंद्रप्रमुख आशा घुले, संगमनेर अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्या सविता घुले, ग्रामपंचायतचे सरपंच सुदाम खैरे, उपसरपंच सोमनाथ थिटमे,ग्रामपंचायत सदस्या सचिता घुले,पोपट खैरे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन आगळे,सदस्या सुनिता घुले,अंजली काशीद,संदीप घुले,मुख्याध्यापक एकनाथ साबळे यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यापक विद्यालयातील छात्र अध्यापक व अध्यापिका यांनी आंतरवासिता कालखंडा दरम्यान वेगवेगळे उपक्रम व स्पर्धा शाळेमध्ये घेतल्या.त्यामध्ये पक्षांसाठी पाणी ठेवणे,क्रीडा स्पर्धा ,सांस्कृतिक स्पर्धा ,वृक्षारोपण ,प्रभात फेरी ,सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन तसेच चाचणी परीक्षा इत्यादी उपक्रमांचे आयोजन केले होते. या सर्व स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना बक्षीसेही मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. ४ मार्च ते १९ मार्च या कालावधीत छात्र अध्यापिका व अध्यापकांनी आपला आंतरवासिता कालखंड पूर्ण केला.
. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.चंद्रकला सापनर,शकुंतला शेळके,सखाराम पाटील,आर.जी.पावसे,सुरेश साळुंके,दस्तगीर शेख,राजेंद्र सूर्यवंशी,सोमनाथ मदने,ग्रामसेविका अनिता माळी,बजरंग जेडगुले,आंतरवासीता कालखंड छात्र मुख्याध्यापिका दिपाली हासे, छात्र पर्यवेक्षिका सविता कांडेकर यांसह सर्व छात्र अध्यापक व अध्यापिका यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुवर्णा चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.कविता भोकनळ यांनी केले.
“किलबिलाट चिमुकल्यांचा”या उपक्रमाचे गटविकास अधिकारी अनिल नागणे,गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड,विस्तार अधिकारी दीपक त्रिभुवन आदींनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!