वाट सुखाची सापडली की आयुष्याची वारी होते-डॉ.विश्वासराव आरोटे.
सर्वोदय विदया मंदिरात बारावी विदयार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न.
अकोले / लोकवेध live न्यूज
सतत प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना कधीच अपयश येत नाही.जो प्रयत्न करतो त्याला यशाची,आनंदाची,सुखाची वाट सापडते.त्यामुळे वाट सुखाची सापडली की आयुष्याची वारी होते. असे प्रदिपादन समर्थ गांवकरीचे संपादक तथा राज्यसरचिटणीस डॉ.विश्वासराव आरोटे यांनी केले.
सत्यनिकेतन संस्थेचे गुरूवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय राजूर येथील इयत्ता बारावीच्या विदयार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला.यावेळी डॉ.आरोटे विचारमंच्यावरून बोलत होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विदयालयाचे प्राचार्य भाऊसाहेब बनकर हे होते.
यावेळी प्रमुख अतिथी अ.नगर कायझेन अॅकेडमीचे संचालक महेश डाळींबकर,उपप्राचार्य अण्णासाहेब धतुरे,प्रा.रमेश शेंडगे,प्रा.संतोष कोटकर,प्रा.दीपक बुऱ्हाडे,प्रा शरद तुपविहीरे,प्रा.बीना सावंत,प्रा.संतराम बारवकर,प्रा.बाळासाहेब घिगे,प्रा.अमोल तळेकर,प्रा.संतोष नवले,प्रा.सुरेश शेटे,प्रा.रविंद्र मढवई,प्रा.विकास जोरवर,प्रा.विनोद तारू,प्रा.सुधिर आहेर,प्रा.संतोष बारामते,प्रा.अजित गुंजाळ,प्रा.आरती देशमुख,प्रा.सुरेखा नवाळी,प्रा.मधुमंजिरी पवार,प्रा.चोथवे,मंगळा देशमुख यांसह विदयार्थी उपस्थित होते.
डॉ.आरोटे यांनी पुढे मार्गदर्शन करताना जिवनात स्वतःसाठी जगताना कधीतरी दुसऱ्यासाठी पण जगा. अपयश ही यशाची पहीली पायरी असते.हार कधीच मानु नका.विचारांची दिशा बदला.योग्य वाट दाखवण्याचे कार्य करा.ध्येय निश्चित करा.राग मनात धरू नका.क्षेत्र निवडताना अपयश आले तर उत्कृष्ट शेतकरी व्हा.असे विचार व्यक्त केले.
महेश डाळींबकर यांनी माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो. तर तो विचारांवरून ठरत असतो.जिवन जगत असताना शाळेतील गुण व गुणवंता यांचा काहीही सबंध नसतो.स्पर्धा परिक्षेत यशस्वी होणे अवघड नाही,त्यासाठी जिद्द असावी.जिवनात जिद्द,संयम,प्रामाणिकपणा असेल तर आपले अस्तित्व कुणीच संपवू शकत नाही.शिक्षकांचे मार्गदर्शन विसरू नका.आई,वडील भक्कम आधार आहे.फक्त झेप घेण्याची तयारी ठेवा.स्वतःला सिद्ध करा.संघर्षाची तयारी ठेवा.चुकीच्या पद्धती टाळा.निश्चितच यश मिळेल.असे विचार प्रतिपादीत केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊसाहेब बनकर यांनी आई,बापाच्या कष्टाची जाणीव असणारी मुलं कधीच वाया जात नाही.कष्टांवर विश्वास ठेवा.विद्यालय म्हणजे रत्नाची खान आहे.ध्येय निश्चित करा.शिक्षकांनी पंखात बळ निर्माण केले,याची जाणीव ठेवा.कौशल्य,क्षमतांचा विकास करा. चिंतन,मनन करून जिवनाची दिशा ठरवा.असे विचार व्यक्त केले.
शिक्षक प्रा.सुरेश शेटे,प्रा.रविंद्र मढवई यांनी मार्गदर्शन करत बोर्ड परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या.
विदयार्थी अस्मीता गंभिरे,विजया सावंत,सुयोग साबळे,निखिल निकाळजे,भिमाशंकर शिंदे,यश जाधव यांनी विदयालयाप्रती विचार व्यक्त केले.यावेळी द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषीक वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य अण्णासाहेब धतुरे यांनी केले.तर अतिथींचा परिचय व स्वागत प्रा.शरद तुपविहिरे यांनी केले.
सुत्रसंचलन प्रा.सचिन लगड यांनी केले तर प्रा.संतोष कोटकर यांनी आभार मानले.
