वाट चुकली तर दुप्पट चालावे लागते – डीवायएसपी वाघचौरे साहेब
प.पू गगनगिरी महाराज विद्यालयात विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास, धोके, समस्या यावर उपाय या कार्यक्रम संपन्न
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
शालेय जीवनात शिक्षण घेत असताना विशिष्ट ध्येय मनात ठेवून त्या पद्धतीने शिक्षण घ्यावे आपण सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलो आपली सुरुवात बैलगाडीतून सुरू झाली ती लाल दिव्या पर्यंत पोहोचली पाहिजे त्यासाठी कष्ट घेण्याची तयारी ठेवा अहोरात्र अभ्यास करून आई-वडिलांचे स्वप्न साकार करा त्यासाठी स्पर्धा परीक्षा मध्ये यश मिळवून आई आई वडिलांना लाल दिव्याच्या गाडीतून फिरवा या वयात वाट चुकली तर आपल्याला दुप्पट चालावे लागते तरीही योग्य मार्ग सापडेल याची खात्री नसते असे प्रतिपादन डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे साहेब यांनी केले
संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालयात विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास, धोके, समस्या यावर उपाय या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी ते बोलत होते
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बापूसाहेब देशमुख होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डीएम देशमुख कैलासशेठ काळे सुभाष पवार विलास साळवे, भाऊसाहेब वाकचौरे, माजी प्राचार्य मुकुंद डांगे प्राचार्य रमेश वाळेसर संचित भारती आदी सह पालक वर्ग विद्यार्थीउपस्थित होते
यावेळी वाकचौरे पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांनी शक्यतो मोबाईल वापरणे टाळा वापरलाच तर जे असेल ते बघा मुलींनी सोशल मीडियावर मैत्री करणे टाळा कारण सोशल मीडियावर फक्त फसवणूक होते हे वय शिक्षणाचे आहे फक्त शिक्षणच घ्या आमच्याकडे सध्या तरुण मुलींना फसवलेले हेच गुन्हे जास्त आहेत आपली फसवणूक होऊ नये यासाठी काळजी घ्यावी आज समाजात जे विदारक दृश्य आहे फक्त मुलींची आणि महिलांशी निगडित आहे शैक्षणिक व आध्यात्मिक संकुलात येणे यात आमच्या वर्दीचा स्वार्थ आहे कारण विद्यार्थी तसेच व्यक्तिमत्व विकास झाला तर भावी पिढी मानसिक दृष्ट्या सदृढ निर्माण होईल होऊन समाजातील गुन्हेगारी कमी होईल
कार्यक्रमाची सुरुवात गगनगिरी महाराजांच्या पुष्पहार घालून व दीप प्रज्वलानाने केली
यावेळी एन एम एम एस सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी विद्यार्थी व शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेतील विद्यार्थ्यांचे डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी प्राचार्य मुकुंद डांगे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ललित शेळके यांनी केले तर आभार प्राध्यापक दिलीप डोंगरे सर यांनी केले
