मा श्री भाऊसाहेब संतुजी थोरात उच्च माध्यमिक विद्यालयात बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न
कनोली / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील कनोली येथील मा.श्री.भाऊसाहेब संतुजी थोरात माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कनोली या विद्यालयात इ.१२ वी सायन्स या वर्गाचा निरोप समारंभ संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी वर्पे उपस्थित होते तसेच विद्यालयाचे प्राचार्य वर्पे के. एम. सर प्राथमिक विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक संजय वर्पे सर आदी उपस्थित होते विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या संदर्भात आणि पुढील वाटचालीसाठी प्राचार्य केएम वर्पे सर मार्गदर्शन केले. यावेळी आलेल्या पाहुण्यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या यावेळी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांच्या समवेत निरोप समारंभ संपन्न झाला
