विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे-आचार्य बाबुराव गवांदे

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. फक्त मनात आत्मविश्वास असेल तर अशक्य गोष्ट शक्य करता येते. असे प्रतिपादन सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संगमनेर संस्थेचे रजिस्ट्रार विशिष्ट आचार्य बी. आर गवांदे यांनी शहरातील गोखले एज्युकेशन सोसायटीचे सर डी एम पेटिट विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या ३९ व्या वार्षिक पारितोषिक वितरण व इयत्ता १२ वीच्या निरोप समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री निकम सी एन यांच्या सह व्यासपीठावर शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्ष सौ मंगल हरनामे, पर्यवेक्षिका तथा अधीक्षक डॉ. अस्मिता देशपांडे, इन्चार्ज प्रा. गुलाब गायकवाड, शिक्षक प्रतिनिधी प्रा. दशरथ गभाले, ग्रंथपाल सांगळे के के आदी उपस्थित होते. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले. प्रमुख पाहुणे बी आर गवांदे यांनी इयत्ता १२वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी आलेल्या संधीचे सोने करावे. चांगला अभ्यास करून आपल्या आई-वडिलांचे व कॉलेजचे नाव उज्वल करावे. हे करत असताना जीवनाचे ध्येय निश्चित करावे. अध्यक्ष भाषणात प्राचार्य निकम सी एन म्हणाले की, जिद्द, परिश्रम व चिकाटी या त्रिसूत्रीच्या जोरावर विद्यार्थ्यांनी यश संपादन करावे असे सांगून परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक व अहवाल वाचन इन्चार्ज प्रा.गुलाब गायकवाड यांनी केले. प्रा. रूपाली देशमुख व प्रा. दशरथ गभाले यांनी यादी वाचन केले. प्रा. भाऊसाहेब मांढरे यांनी बक्षीस मांडणी केली. या कार्यक्रमासाठी प्रा. अमोल टेमक, प्रा. सीमिका मिश्रा, प्रा. उषा जाधव, प्रा. सुशीला चिमणकर आदींसह सर्व विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष धुळे, मनीषा खाटेकर, माणिक भडांगे यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रा. सुनीता शिंदे यांनी सूत्रसंचालन करून प्रा. परेश सांगवीकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!