मल्हारराव होळकर विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथील मल्हारराव होळकर माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शनिवार दिनांक 16/02/2024 रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन मा.सहादू दामु खेमनर हे तसेच कार्यक्रमास स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य रावसाहेब रावजी खेमनर,प्राचार्य आर.आर. गायकवाड सर भागवत मंजाबापू खेमनर व भाऊसाहेब येसू खेमनर मान्यवर उपस्थित होते. तसेच बक्षीस वितरणासाठी व्यावसायिक देणगीदार आवर्जूून उपस्थित होते. ज्यांनी बक्षीस वितरणसाठी भरीव मदत देवून सहकार्य केले.तसेच या कार्यक्रमाला सर्व शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते.क्रिडा शिक्षक मा.काकड सर यांनी सुंदर कार्यक्रमाचे नियोजन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे शिक्षक यादव सर यांनी केले.उपस्थित सदस्य ,पालक, ग्रामस्थ,देणगीदार यांचे आभार मा.वैराळ सर यांनी मानले.
