मास्टर बुक बाजार अकोले यांच्याकडून टाकळी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना दप्तर वाटप

अकोले / लोकवेध live न्यूज 

२५ वर्षांची शैक्षणिक सेवेची अखंड परंपरा असलेले अकोले तालुक्यातील मास्टर बुक बाजार फर्मकडून जिल्हा परिषद शाळा टाकळी व माध्यमिक विद्यालय टाकळी येथील मागील वर्षी इयत्तानिहाय प्रथम क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले. यावेळी मास्टर बुक बाजार फर्मचे संचालक संदेश आवारी व मच्छिंद्र आवारी यांनी विद्यार्थ्यांना फर्मच्या नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. प्रस्तुत दप्तर वितरण कार्यक्रमास शाळा व्यवस्थापनाचे विलासराव शेवाळे, बबनराव तिकांडे, डाॅ. जनार्दन मोरे, बाळासाहेब फोडसे, संतोष नाईकवाडी उपस्थित होते. अकोले तालुका गटशिक्षणाधिकारी मा. अभयकुमार वाव्हळ साहेब तसेच देवठाण बीटाचे विस्तार अधिकारी मा. अनिल गायकवाड साहेब व टाकळी केंद्राच्या केंद्रप्रमुख मा. रोहिणी खतोडे मॅडम यांनी मास्टर बुक बाजार फर्मचे व आवारी बंधुंचे स्तुत्य उपक्रमाबद्दल अभिनंदन केले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीनिवास पोतदार, संजय देशमुख, दत्तात्रय देवगिरे, संजय शिंदे तसेच आहेर मॅडम व वाकचौरे सर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!