जिद्द मेहनत व कष्टातूनच यश मिळते- भाऊसाहेब कासार
सर्वोदय विदया मंदिर विदयालयात १०वीचा सदिच्छा समारंभ संपन्न.

राजूर/ लोकवेध live न्यूज

विद्यार्थी दशेत ध्येय ठरवून त्यासाठी कष्ट केले, मेहनत घेतली तरच यश मिळते. यशाला कुठलाही शॉर्टकट नसतो.असे प्रतिपादन प्रयोगशील शिक्षक,लेखक भाऊसाहेब कासार यांनी केले.
सत्यनिकेतन संस्थेचे गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्यामंदिर राजुर येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न झाला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाऊसाहेब कासार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य भाऊसाहेब बनकर, केंद्रप्रमुख बाळासाहेब जाधव,दीपक पाचपुते, पर्यवेक्षक सदाशिव गिरी,आदी उपस्थित होते.
भाऊसाहेब कासार यांनी पुढे बोलताना,परीक्षेत यश मिळवणे अवघड नाही. त्यासाठी कष्ट करण्याची तयारी हवी.आई वडील व शिक्षकांचे मार्गदर्शन घेत मार्गक्रमण करा. यश तुमचेच आहे.यश मिळाले की आपली शाळा आणि आई-वडिलांना विसरू नका. त्यांच्या प्रती कृतज्ञ राहा.असे प्रतिपादन कासार यांनी केले.यावेळी प्राचार्य भाऊसाहेब बनकर म्हणाले की,परीक्षेला सामोरे जाताना धाडसाने सामोरे जा वेळेचे योग्य नियोजन करा.परीक्षेची भीती मनात बाळगू नका. उज्वल यश मिळवून शाळेचे नाव मोठे करा.
राजूर केंद्राचे केंद्रप्रमुख बाळासाहेब जाधव दीपक पाचपुते आदींची यावेळी भाषणे झाली.विदयार्थी गोरक्ष लहामटे,आरती भांगरे,पुर्वा लहामगे,सृती बरवे,ज्ञानेश्वरी घिगे,मेघा
खोकले,माया नाडेकर,आल्फेज खाटीक,प्रतिक इधाते यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वंदना सोनवणे यांनी केले.सुत्रसंचालन श्रीकांत घाणे यांनी केले.तर महेश दिंडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!