संगमनेर = सुभाष भालेराव 

ढोल ताशे आणि तुतारी वादनाने भारावलेले वातावरण, ठिकठिकाणी सादर होणाऱ्या पोवाड्यांमधून उलगडणारी शिवाजी महाराजांची शौर्यगाथा अन् भगवे ध्वज हातात घेऊन उत्साहात सहभागी झालेले आबालवृद्ध…… छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर, प्रेम आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी शिवप्रेमींनी विविध कार्यक्रमांतून रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी केली.
संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती ग्रामपंचायत जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा आणि परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालय या ठिकाणी, सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करून, शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. आयोजित केलेल्या वैविध्यपूर्ण कार्यक्रमांमुळे गावाला जणू हिंदवी स्वराज्याचे प्रतिक असलेल्या भगव्या रंगाने व्यापले होते.
शिवजयंतीनिमित्त छत्रपती चौकात शिवाजी महाराज यांच्या महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुधाकर रोहम होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच नारायण मरबळ उपसरपंच मिनीनाथ जोरवेकर काकासाहेब गायकवाड राजेंद्र देशमुख नवनीत देशमुख किरण रोहम मा उपसरपंच अजित देशमुख, अण्णासाहेब वाकचौरे सर, किशोर जोर्वेकर, शिवराम वाकचौरे, गंगाराम वाकचौरे, संजय देशमुख, महाराज संजय बागुल, राहुल निकम अनिल ठोंबरे निलेश चत्तर ग्रा प सदस्य निलेश बागुल , पोलीस पाटील विनोद साळवे, राहुल बागुल, संतोष देशमुख, संतोष वाकचौरे, अजित मांडे, सनी राहिंज, दादाभाऊ रकटे , भीमा राहिंज, सुधीर रोहम, दत्तू वाकचौरे ,संजय साळवे, सुरेश साळवे, प्रदीप मांडे, नितीन बागुल, आधी सह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते
या वेळी शिवव्याख्याते भूपाल शेळके यांचे व्‍याख्यान आयोजित करण्यात आले होते.
शिवरायांनी मराठी माणसाचा कणा ताठ करून, त्याला सन्मानाने जगण्याची प्रेरणा दिली. त्यांचा आदर्श प्रत्येक तरुण पिढीने घेतला पाहिजे, तसेच शिवरायांची लोकशाही, शिवरायांचे रयतेविषयी असलेले प्रेम, शिवरायांची राजनीती आपल्या व्‍याख्यानातून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पटवून दिली.
शिवजयंती उत्सवाप्रित्यर्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी  शिवचरित्र कथाकथन, पोवाडा गायन, नाटक असे विविध कार्यक्रम सादर केले. संजय बोरसे यांनी मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर वर्ग सहभागी झाले.
तर परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालयात महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मुलांनी गाण्यांवर डान्स करत  विविध मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली प्राचार्य मुकुंद डांगे यांनी विद्यार्थ्यांना शिवरायांबद्दल माहिती दिली
 कार्यक्रमाचे आयोजन शिवजयंती उत्सव समिती पिंपरणे यांच्यावतीने करण्यात आली होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!